लातूर, दि. २९ - गंजगोलाई परिसरातील भाजी वाले / फळवाले व इतर पथविक्रेते भरपूर प्रमानात त्या ठिकाणी व्यवसाय करीत आहेत, परंतु त्याठिकाणी मोठी बाजार पेठ असल्या कारणामुळे वारंवार रहदारील अडचणी निर्माण होत आहेत, सदरील रहदारीस अडचण येऊ नये, पावसाच्या पाण्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी त्या ठिकाणी होऊ नये, तसेच अनधिकृत पणे काहीजण अतिक्रमण करून बसल्या मुळे आज लातूर शहर महानगर पालिकेच्या वतीने अतिक्रमण मुक्त गोलाई करण्यासाठी कारवाई करण्यात आली .
गंजगोलाई येथील जुनी नवयुग टाकीजच्या समोर , नावंदर ते इलमचंद परिसरात अतिक्रमण करण्यात आलेले होते त्या ठिकाणी सकाळी ६ वाजल्या पासून कारवाई सुरु करून परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात आला .
त्यानंतर गोलाई तील भुसार लाईन , कापड लाईन व मस्जिद रोड वरील काही भाग त्या ठिकाणी असणार्या नाल्या वरील सर्व अतिक्रमण काढण्यात आले , सदरील कारवाई रात्री उशिरा पर्यंत चालनार आहे, अन्यथा दुसरया दिवशी पुन्हा कारवाई राबविण्यात येणार आहे , असे आवाहन लातूर शहर महानगर पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे , तरी लातूर शहरातील अतिक्रमण केलेल्या व्यापारी व नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काडून घ्यवे अन्यथा मनपा वतीने कारवाई करण्यात येणार आहे .
सदरील कारवाई आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त हर्षल गायकवाड , संभाजी वाघमारे , पोलीस उपअधीक्षक हिम्मत जाधव , सहायक आयुक्त वसुधा ङ्गड , उज्ज्वला शिंदे , संजय कुलकर्णी , सुर्यकांत राउत , कलीम शेख ,सहदेव बोराडे , समीर मुलाणी , व अतिक‘मण विभागातील सर्व कर्मचारी , स्वच्छता निरीक्षक व पोलीस कर्मचारी यांनी केली .
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment