लातूर :
लातूर जिल्ह्यात कधी नव्हे ती एवढी हप्तेखोरी, सुपारीगिरी बोकाळली आहे या सर्व गोष्टीवर पायबंद घालण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची आहे. यामध्ये ते सपशेल अपयशी ठरले असून लातूरच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक वातावरणात गुन्हेगारी वाढली आहे. लातूरचे सौहार्दपुर्ण वातावरण का बिघडले? असा संतप्त सवाल माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी उपस्थित केला.
लातूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्यावतीने कॉंग्रेस भवन लातूर येथे गुरुवार दि. २८ रोजी कॉंग्रेस पदाधिकारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणुन आमदार अमित विलासराव देशमुख बोलत होते. व्यासपीठावर मराठवाडा समन्वयक तथा जालना जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष भिमराव ठोंबरे, जिल्हा प्रभारी माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, जिल्हाध्यक्ष ऍड व्यंकट बेद्रे, शहराध्यक्ष मोईज शेख, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, महिला जिल्हा अध्यक्ष प्रा.डॉ.स्मिता खानापूरे, जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख, जळकोट तालुका अध्यक्ष मन्मथप्पा किडे, चंद्रकांत मद्ये, प्रदेश सरचिटणीस सपना किसवे, माजी नगरसेविका केशरताई महापूरे आदि उपस्थीत होते.
पदाधिकारी बैठकीत बोलताना अमित विलासराव देशमुख म्हणाले की, सामान्य माणसाला या सत्ताधारी लोकांकडून न्याय मिळत नाही. अनागोंदी कारभार, भ‘ष्टाचार, महागाई, स्त्रियांवरील अन्याय-अत्याचार, सामाजिक असमतोलाचे प्रमाण वाढले आहे. लातूरचा नागरिक या नात्याने आपण हे सर्व पाहात राहणार काय? असा सवाल करत या सत्ताधारी लोकांना जाब विचारण्यासाठी आपण आवाज उठवला पाहिजे. अविनाश चव्हाण यांच्या मारेकर्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि वाढती गुन्हेगारी थांबली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
शेतकर्यांच्या शेती मालाला हमीभाव नाही, तुरीची खरेदी होत नाही, अजुनपर्यंत पिकविमा मिळालेला नाही. दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई व बेरोजगारीमुळे जनता हताश झालेली आहे. हे सर्व चित्र बदलण्यासाठी पदाधिकार्यांनी मरगळ झटकून दिली पाहिजे. राज्यभरात शेतकरी, व्यापारी, सामान्य जनता त्रस्त आहे. हे थांबवण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून उपाययोजना केली जात नसून सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय सरकार घेऊ शकत नाही. त्यामुळे समतेचे सरकार आणण्यासाठी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांनी कामाला लागले पाहिजे. पदाधिकारी यांनी सरकारच्या धोरणाचा विरोध दर्शवला पाहिजे. पक्षांतर्गत चढाओढ न करता चिंतन मनन करुन पक्षाची ध्येय धोरणाचा विस्तार व प्रसार करावा लोकांच्या अडीअडचणी सोडवून त्यांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करावा. निष्ठेने काम करणार्यांना पक्षात नक्कीच स्थान मिळेल.
सरकारच्या विरोधात जनतेमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. सत्ताधार्यांना खाली खेचण्यासाठी देशाचे माजी पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्या २० ऑगस्ट या जयंतीदिनी जिल्हाभरात परिवर्तन यात्रा काढून २६ मे लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीदिनी या यात्रेचा समारोप करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात होणार्या निवडणुकींना सामोरे जाण्यासाठी पदाधिकार्यांनी तयारी करावी. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.राहुलजी गांधी पदाधिकार्यांशी थेट संवाद साधतील असे काम आपण करावे. अशा सुचनाही माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी दिल्या.
पदाधिकारी बैठकीस जिल्हा प्रभारी माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, मराठवाडा समन्वयक भिमराव ठोंबरे यांनीही मनोगत व्यक्त केले. लातूर विधानसभा मतदार संघ समन्वयक राजकुमार जाधव, जिल्हा परिषद विरोधीपक्ष नेता संतोष तिडके, तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष दगडुसाहेब पडीले, अहमदपूर तालुका अध्यक्ष डॉ.गणेश कदम, लातूर विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष महेश काळे, शिरुर अनंतपाळ तालुकाध्यक्ष प्रभाकर बंडगर, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष बिरबल देवकते, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष शरद देशमुख, सोशल मिडीया प्रमुख अल्ताङ्ग शेख, देविदास बोरुळे पाटील, मागासर्गीय सेल, अल्पसं‘यांक सेल, विविध विभागाचे तालुका प्रतिनीधी, पदाधिकारी मोठ्या सं‘येने उपस्थित होते.
तीन तासात शिक्षणाधिकारी
जालना जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती असताना भिमराव ठोंबरे यांनी एक अडचण घेऊन वर्षा बंगला येथे लोकनेते विलासराव देशमुख यांची भेट घेतली. त्यावेळी ते शिक्षण खात्याचे सभापती असताना कित्येक दिवसापासून शिक्षणाधिकारी पद रिक्त होते. ही गोष्ठ त्यांनी लोकनेते विलासराव देशमुख साहेबांना सांगितली. ही अडचण सांगुन ते जालन्याला परत येईपर्यंत शिक्षणाधिकारी रुजू झाले. यांची बातमी त्यांना कळाली. ही लोकनेते विलासराव देशमुख साहेबांच्या कामाची पध्दतीची त्यांनी उपस्थितांना आठवण करुन दिली.
सेल्फी विथ कॉमन मॅन
पदाधिकार्यांनी पदासाठी काम करु नये, सामान्य माणासाचे प्रश्न समजुन घ्यावे, त्यांच्या सोबत जाऊन त्यांच्या अडअडचणी सोडवण्यास मदत करावी. त्यांच्या व्यथा, वेदना सेल्ङ्गी मार्ङ्गत सत्ताधार्यांपर्यंत पोहचवाव्यात. तोच खरा कार्यकर्ता, तोच खरा सेल्फी असेल.
No comments:
Post a Comment