हिंगोली / प्रतिनिधी
सेनगाव तालुक्यातील वाढोणा येेथे आ. तान्हाजीराव मुटकुळे यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत सभामंडपाचे बांधकाम पुर्ण झाले असून 23 नोव्हेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते या नविन वास्तुचे लोकार्पण करण्यात आले.
5 लाख रूपयांच्या निधीतून उभारलेल्या या सभामंडपाचे उद्घाटन आ. तान्हाजीराव मुटकु ळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भाजपा नेते ऍड. शिवाजीराव जाधव, कांताराव देशमुख, सरपंच शंकरराव देशमुख, जीवाजी वामन, जितू महाजन, विजय डोखळे, गजानन देशमुख यांच्यासह वाढोणा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment