स्व.अंंकित धूत यांच्या स्मरणार्थ रेल्वेस्थानकास 'बॅटरी कार'चे लोकार्पण

Saturday, November 24, 2018



लातूर
तरूण वयातच अकाली निधन पावलेले युवा व्यापारी स्व. अंकित अलोककुमार धूत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी लातूरच्या रेल्वेस्थानकास ४ लाख रुपये किमतीच्या 'बॅटरी कार'चे लोकार्पण रेल्वेचे जनरल मॅनेजर देवेंद्र शर्मा यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी करण्यात आले.

स्व. अंकित यांचे पिताजी अलोककुमार बद्रीनारायणजी धूत यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ही कार आपल्या दिवंगत पुत्राच्या आठवणीदाखल रेल्वेस्थानकास दिली असून, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या वाहतुकीसाठी प्लॅटफॉर्मवर त्यांना नेण्यासाठी या बॅटरी कारचा उपयोग होणार आहे. प्रारंभी स्व. अंकितच्या आजी शांताबाई बद्रीनारायणजी धूत आणि मातोश्री गीतादेवी अलोककुमार धूत यांच्या हस्ते बॅटरी कारचे पूजन करण्यात आल्यानंतर रेल्वेचे जनरल मॅनेजर डी. के. शर्मा यांच्या हस्ते आणि खा. डॉ. सुनील गायकवाड यांच्या उपस्थितीत कारचे उद्घाटन करण्यात आले. ही कार बंगळुरूवरून खास मागविण्यात आली असून, मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसनंतर लातूर येथेच ही सुविधा उपलब्ध झाली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून समाजाचे अध्यक्ष राजकुमार पल्लोड, डॉ. हंसराज बाहेती, कर सल्लागार प्रकाश कासट, भा. ई. नगराळे, 'पुण्यनगरी'चे वरिष्ठ वृत्तसंपादक जयप्रकाश दगडे, वसंतराव पाटील, तुकाराम पाटील, संगमेश्वर बोमणे, रामानुज रांदड, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर यांची उपस्थिती होती. धूत परिवारातील आशीष धूत, श्यामसुंदर धूत, कृष्णा धूत, जगदीश तापडिया आणि अलोककुमार धूत यांनी सर्व अतिथींचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हादभाऊ बाहेती यांनी केले. कार्यक्रमास शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.



No comments:

Post a Comment