हिंगोली / प्रतिनिधी
येथील नारायण नगर येथे गुरूवारी डॉ.रखमाबाई राऊत यांच्या जयंतीनिमीत्त जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने प्रतिमा पुजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अध्यक्षा ज्योतीताई कोथळकर, डॉ. सोनाली कदम, डॉ. सुनिता खेडकर, डॉ. राधिका देशमुख, शितल सावके, वर्षा सरनाईक, राजश्री क्षिरसागर, जया पवार, वंदना कदम, वर्षा देशमुख, शिवनंदा कऱ्हाळे, ललिता शेळके, सावित्री शिंदे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात बोलताना कोथळकर म्हणाल्या की, डॉ. रखमाबाई राऊत या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. त्यांचे वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान असून त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यामुळे डॉक्टर्स डे हा डॉ. रखमाबाई राऊत यांच्या नावाने साजरा करण्यात यावा.

No comments:
Post a Comment