हिंगोली / प्रतिनिधी
आयोध्या येथील प्रभु रामचंद्राच्या मंदिराच्या निर्मीतीसाठी शिवसेेनेने पुढाकार घेतला असून जय श्रीरामचा नारा देत हिंगोलीवरून शिवसैनिकांचा पहिला टप्पा 23 नोव्हेंबर रोजी आयोध्येकडे रवाना झाला आहे.
शिवसेनेच्या वतीने जिल्हाभरात 24 नोव्हेंबर रोजी गावोगावी प्रभु रामचंद्राच्या आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने ग्रामीण भागात राम मंदिराचा विषय शिवसेनेच्या वतीने पोहोचविला जात असून शिवसेना पक्ष प्रमुखांनी घेतलेल्या भुमिकेनुसार हिंगोलीतून 23 नोव्हेंबर रोजी अनेक शिवसैनिक जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली आयोध्यकडे रवाना झाले आहेत. यामध्ये युवा नेते राम कदम, जिल्हा परिषद सदस्य फकीरराव मुंडे, अशोक नाईक, श्रीराम बांगर यांच्यासह शिवसैनिकांचा समावेश आहे.

No comments:
Post a Comment