पोलीस भरतीतील घोटाळा अतिरिक्त पोलीस अधिक्षकाला भोवला ! मिठ्ठेवाड यांना ठोकल्या बेड्या

Friday, November 23, 2018

हिंगोली / प्रतिनिधी
हिंगोली येथे झालेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या भरतीत घोटाळा झाल्याचे प्रकरण सबंध राज्यभरात गाजले होते. याप्रकरणी एसआरपीचे तत्कालीन समादेशक व हिंगोलीचे माजी अप्पर पोलीस अधिक्षक नामदेव मिठ्ठेवाड यांना हिंगोली पोलीसांनी बेड्या ठोकल्या असून आरोपी मिठ्ठेवाड यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुचनावली असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. 


हिंगोली येथील राज्य राखीव पोलिस दल गट क्र. 12 च्या पोलीस भरतीमध्ये घोटाळा झाल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या चौकशीत समोर आले होते. त्यानंतर दि. 11 मे 2018 रोजी हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये तत्कालीन सहाय्यक समादेशक जयराम फुपाटे, सुत्रधार पोलीस चालक नामदेव ढाकणे, एस.एस.जी. सॉफ्टवेअर कंपनीचे ऑपरेटर शिरीष औधूत, पोलीस कर्मचारी शेख महेबुब शेख आगा यांच्यासह गुण वाढवून नोकरी मिळविणाऱ्या 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक राहुल मदणे यांच्यासह पथकाकडे होता. सन 2013 ला 4, सन 2014 मध्ये 10 तर सन 2017 मध्ये 6 अशा एकूण 20 जणांचे गुण वाढवुन त्यांची एसआरपीत भरती करण्यता आली. दरम्यान, तपास अधिकारी तथा डीवायएसपी राहुल मदणे यांनी चौकशीसाठी एसआरपीचे तत्कालीन समादेशक तथा हिंगोलीच माजी अप्पर पोलीस अधीक्षक नामेदव मिठ्ठेवाड यांना आज बोलाविले होते.

अर्थपुर्ण देवाणघेवाणीतुन मर्जीत उमदेवारांचे चांगभले करण्यासाठी दिलेली उत्तर पत्रिका व संगणकातील बाबी उघड झाल्यानंतर डिवायएसपी मदणे यांनी मिठ्ठेवाड यांना अटक केली. यानंतर गुरूवारी सायंकाळी 5 वाजता हिंगोली येथील न्यायालयात मिठ्ठेवाड यांना हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्याचे मदने यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment