हिंंगोली / प्रतिनिधी
सेनगाव येेथे कॉंग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या गटाने 22 नोव्हेंबर रोजी निराधार शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्नांवर भव्य मोर्चा काढला. विशेष म्हणजे खा. सातव गटाने याच मागण्यांसाठी 21 नोव्हेंबर रोजी सेनगाव तहसीलवर मोर्चा काढला होता. भाऊ पाटील गटाने काढलेला मोर्चा हा लक्षवेधी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
एकाच मागणीसाठी, एकाच विधानसभा मतदार संघात कॉंग्रेसचे खा. राजीव सातव आणि माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर हे मतदार संघातील त्यांचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी एकमेकांवर कुरघोड्या करीत असताना दिसत आहेत. दि. 21 नोव्हेंबर रोजी खा. सातव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, कॉंग्रेसचे माजी जि.प.सदस्य विनायक देशमुख यांच्या नेतृत्वात तालुक्यातील निराधार लाभार्थी, शेतकरी यांच्या विविध माण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी दि. 16 नोव्हेंबरलाच मोर्चासंबंधी तहसील प्रशासनाला निवेदन सादर केले होते. परंतू, खा.राजीव सातव गटाने एक दिवस अगोदरच मोर्चाचे आयोजन करून माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. 22 नोव्हेंबर रोजी माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या मोर्चात सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर तसेच निराधार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हा हजारोंचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. कॉंग्रेसच्या वेगवेगळ्या दोन गटांनी एकाच मागणीसाठी एकापाठोपाठ एक सेनगाव तहसीलवर दोन मोर्चे काढल्याने जिल्ह्यात कॉंग्रेसचे राजकारण ढवळून निघाले असून भाऊ पाटील गटाने काढलेल्या भव्य मोर्चाची चर्चा गुरूवारी दिवसभर ऐकावयास मिळाली. यावेळी तालुकाअध्यक्ष प्रकाश देशमुख, माजी जि.प.सदस्य द्वारकादास सारडा, कांतराव हराळ, शिक्षण सभापती संजय देशमुख, सभापती स्वाती पोहकर, नारायण खेडेकर, रणजीत पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment