नांदेड : सर्वांना माझे नम्रपणे एकच सांगणे आहे की, बाबांनो आत्महत्या करू नका. जीव विनाकारण गमावू नका, तशी वेळ आलीच तर शिवसेनेच्या या भागातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिकांना आवाज द्या, ते तुमच्या दु:खाचे निवारण करतील, अशी कळकळीची विनंती शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरवट आणि नवरदेववाडी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना केली.
या वेळी शेतकरी म्हणाले की, सरकारने कर्जमाफीची घोषणा करताच आम्ही खूप झालो खरे, मात्र ही कर्जमाफी फक्त कागदावरच राहिली. प्रमाणपत्र मिळाली, मोठा गाजावाजा झाला. मात्र हातात काहीच पडले नाही. यामुळे जगायचे कसे असा प्रश्न आम्हाला निर्माण झाला आहे.शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे मंगळवारी दुपारी दीड वाजता विमानतळावर आगमन झाले. दुष्काळग्रस्त भागाची पाहणी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आदित्य ठाकरे तीन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासोबत युवा सेनेचे वरुण सरदेसाई, सिद्धेश कदम, पूर्वेश सरनाईक हे देखील मराठवाड्यामध्ये आले आहेत.
No comments:
Post a Comment