औरंगाबाद: पैसे भरण्यासाठी बँकेच्या रांगेत उभ्या असलेल्या तरुणाच्या बॅगमधून चोरट्याने ७२ हजार रुपये पळवले. हा प्रकार सोमवारी दुपारी रेल्वे स्टेशन रोडवरील एसबीआय बँकेत घडला. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सय्यद महेबूब अली सय्यद रियाज अली (वय १९, रा. सादातनगर, रेल्वे स्टेशन परिसर) हे सोमवारी दुपारी रेल्वेस्टेशन रोडवरील एसबीआय बँकेत पैसे भरण्यासाठी गेले होते. पैसे भरण्यासाठी सय्यद हे रांगेत उभे होते. त्याच्या पाठीवरील बॅगमध्ये त्यांनी रक्कम ठेवली होती. अज्ञात चोरट्याने पाठीमागून त्याच्या बॅगची चैन काढून त्यातील ७२ हजार रुपये लांबवले. काही वेळाने हा प्रकार सय्यद यांच्या लक्षात आला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँकेत एकच खळबळ उडाली. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जमादार पवार हे तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment