लातूकराप्रती काढलेल्या वक्तव्याचा निषेध
प्रतिनिधी। लातूर
लातूर येथील मराठा समाजाबद्दल काढलेल्या आक्षेपाहार्य वक्तव्याबद्दल नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे मराठा क्रांती लातुरच्या वतीने मंगळवारी दहन करण्यात आले. राणे यांच्याविरोधात जोरदाऱ् घोषणाबाजी करीत त्यांच्या प्रतिमेला आंदोलकांनी जोडे मारले. मराठा क्रांती भवनासमोर हे आंदोलन झाले.
लातूर येथे ( २९ जुलै) रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा क्रांतीच्या समन्वयकांची राज्यस्तरीय बैठक झाली होती. याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी मराठी समाजातील काही प्रतिनिची सह्याद्रीवर बैठक घेतली होती. तिचा लातुरच्या बैठकीत निषेध करण्यात आला होता. त्यावर नारायण राणे यांनी हरकत घेऊन. वादग्रस्त विधान केले होते.
त्यांच्याकडून कायदा शिकावा असा उपरोधिक सल्ला त्यांनी लातुरच्या मराठा बांधवांना दिला होता त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. राणे यांना कायदा शिकवायची एवढी हौस असते तर त्यांनी शिकवणी वर्ग काढावेत नाहीतर एखाद्या विधी महाविद्यालयात मिळाली तर प्राध्यापकाची नौकरी पत्करावी, असा टोलाही आंदोलकांनी लगावला.या आंदोलनास मराठा क्रांतीचे युवक व समाजबांधव उपस्थित होते.
काय म्हणाले होते राणे?
कोण आहेत ते ? त्यांना लातुरच्या बैठकीत कोणी अॅथोराईज केले ? सरकारने सांगितले का त्यांनी सांगितलेल्याच लोकांना बैठकीला बोलवा? लातुरच्या बैठकीतील लोकांना काही अधिकार नाही. आम्हीही मराठा समाजाचे आहोत आम्हाला अधिकार आहे. कायदे माहित नसतील तर त्यांना माझ्याकडे ऐवून शिकायला सांगा
No comments:
Post a Comment