औसा / प्रतिनिधी
औसा येथे आज मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आठ जणांनी रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. तर केज येथे एक युवकाने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आत्महत्या केली. मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस पेटत चालला आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात टाका गावच्या आठ युवकांनी मराठा समाजाला 30 तारखेपर्यंत आरक्षण जाहीर न केल्यास 31 तारखेला आत्मदहन करू असा इशारा दिला होता
मंगळवारी सकाळी शंभर ते दिडशे लोकांनी तहसील कार्यालयावर जावून आठ युवकांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले. त्यावेळा डीवायएसपी चाऊस, पीआय केंद्रे व त्यांच्या सहकार्यानी सतर्कतेने परिस्थिती नियंत्रणात आणली. आणि अनुचित प्रकार टळला. त्यानंतर औसा आणि रेणापूरचे उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांचे म्हणणे शासनाकडे पाठवितो असे सांगितल्यानंतर अतिप्रसंग टळला. एकंदरीत आंदोलन दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण करत आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा गावच्या युवकाने मराठा समाजाला आरक्षण नाही, नोकरी मिळत नाही, कर्ज कसे फेडायचे अशा प्रकरणामुळे आत्महत्या केली. एकंदरीत कधी, कोठे, काय घडेल हे सांगता येत नाही. दरम्यान, सामाजिक क्षमता वाढत चालली आहे. त्याबद्दल सिनेस्टार व सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांनी खंत व्यक्त केली. व आरक्षणासंदर्भात बोलण्याचे टाळले.
No comments:
Post a Comment