बांबू शेतीने शेतकऱ्यांची समृद्धी व निसर्गाचा समतोल : महाराष्ट्र बांबू मिशन सचिव रेड्डी

Tuesday, July 31, 2018

छाया नारायण पावले


लोदगा / प्रतिनिधी 
बांबू शेतीने कोरडवाहू जमिनीत शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी मिळते व निसर्गाचा समतोल राखला जातो अशा प्रकारचे प्रतिपादन महाराष्ट्र बांबू मिशनचे सचिव रेड्डी यांनी लोदगा येथील फिनिक्स फाऊंडेशन संस्था लातूर व महाराष्ट्र वन विभाग यांच्या वतीने 51 हजार बांबू झाडे लावत असताना व्यक्त केले. 


यावेळा या संस्थेचे अध्यक्ष महाराष्ट्र कृषि मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, विभागीय वन अधिकारी सातोळीकर, जिल्हा कृषि अधिकारी संतोष आळते, सेवानिवृत वन अधिकारी भोसले, सहाय्यक वन अधिकारी मुत्तमवार, सहाय्यक वनरक्षक आर.जी.कोतलवार, कापसाच्या अमृत पॅटर्नचे अमृतराव देशमुख, डॉ. भगवानराव कापसे, राजशेखर पाटील हे कार्यक्रमास उपस्थित होते. 




       
मराठवाड्यासाठी बांबू शेती ही खुपच महत्वाची आणि फलदायक आहे. त्या कमी पावसात कोरडवाहु जमिनीत तीन ते पाच वर्षात शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळायला सुरूवात होेते. आज पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. या परिस्थितीत ग्रीनरी हरीत हे राखलं जाते. राष्ट्रीय वन विभागाच्या धोरणानुसार व महाराष्ट्र बांबू मिशनच्या वतीनेहा उपक्रम राबविला जात आहे. पाशा पटेल यांच्या संस्थेने हा जो प्रकल्प घेतला आहे. तो खुपच महत्वाचा व मराठवाड्यासाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धी वाढते. त्याचं जीवनमान समृद्ध व शाश्वत होेते. 

16 जातीचे बांबूचे रोप तयार करण्यात आले आहेत. आणि तीन ते पाच वर्षानंतर प्रति एकरी चाळीस टन बांबू होतो. तसेच 3500 रूपये दराने तो बांबू विकला जातो. त्यामुळे एकरी एक लाख चाळीस हजार रूपयांचे उत्पन्न मिळते. हे बांबू निर्माण केल्यानंतर बाजारपेठेची अडचण येवू नये म्हणून आम्ही वेगवेगळ्या प्रकल्पासोबत करार केले आहेत असंही यावेळी रेड्डी म्हणाले. 


    महाराष्ट्र कृषि मुल्य आयोगाचे अध्यक्ष व फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने लोकनेते गोपीनाथराव मुंडे महाविद्यालय व छोटूराम महाविद्यालय या तिघांच्या वतीने या ठिकाणी बांबू लावण्यात आलेले आहेत. हलक्या जमिनीत कोरडवाहु शेतीत ऊस शेतीबरोबर उत्पन्न मिळू शकतं असंही यावेळा पत्रकारांशी बोलताना पाशा पटेल म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरूवातीस 51 हजार बांबूचे झाडे लावण्याचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उद्योजक, शेतकरी, परिसरातील नागरीक उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment