रवींद्र सिंघ मोदी : पंजाबच्या भूमिवर सोळाव्या शतकात शीख धर्म उदयास आला. श्री गुरु नानक देव जी यांनी अध्यात्माच्या बळावर एका नवीन धर्माची संकल्पना मांडली. या नवीन संकल्पनेत अध्यात्म आणि मानवतावाद यांचा दृढ संबंध त्यांनी व्यक्त केला. या मुळे जनसामान्यात अशी भावना पसरली की या जगात आता निश्चितच परिवर्तन पाहायला मिळेल. आणि झाले ही तसे. गुरु नानकांनी सामान्य मानवांना जिवन जगण्यासाठी नवी दिशा प्राप्त करून दिली. त्यांचे कार्यें सामान्य माणसांसाठी होते आणि मानवाला मानवाशी जोडणारे असे होते.
गुरु नानक यांच्या जनमापूर्वी भारत भूमी छोट्या-छोट्या राज्यात आणि खंडाखंडात विखुरलेली होती. सर्वत्र मानव अंधश्रद्धेने ग्रासलेला होता. नानकांनी अंधश्रद्धेत अडकलेल्यांना जिवन जगण्यासाठी दिशा दिली. पृथ्वीवर अस्तित्वात असलेले सर्व धर्म एकाच परमेश्वराची पूजा करतात पण पूजेची पध्दत वेगळी आहे, असे गुरुजीनी वेळोवेळी आपल्या प्रवचनात सांगितले. नानकांनी जगाला एकच मंत्र दिला, "एक पिता एकस के हम बारीक". याचा अर्थ आपण सर्व एकाच परमेश्वराची संतान होय.
गुरु नानकदेव यांचा जन्म झाला त्या काळात आपल्या देशावर परकीय देशांचे सतत अतिक्रण सुरु होते. काही वर्षातच पंजाब, सिंध, काश्मीर सारखे राज्य परकीय राजांच्या अधिपत्यात गेले. प्रजेवर जातीनुसार कर लादण्यात येत होते. मानवा-मानावा मध्ये दुरावा निर्माण झाला होता. गोरगरीब जनता अत्याचारात होरपळत होती. अशा वेळी गुरु नानक देव यांचा ईसवी सन १५६९ मध्ये राय-भोये की तलवंडी (पाकिस्तान) मध्ये झाला. त्यांचे वडील महता कालूदास (कल्याणचंद) हे त्या गावाचे पटवारी म्हणून कार्यरत होते.
आई तृप्ता देवी ह्या गृहणी होत्या. नानकांना मोठी बहीण होती, बेबे नानकी ज्यांचा विवाह जयराम यांच्याशी झाला होता. आणि नानकांच्या जीवनात बहिणी बद्दल मोठा जिवाहळा होता. कोवळ्या वयात त्यांनी व्यवसायासाठी मिळालेल्या २० रुपये खर्च करून उपाशी असलेल्या साधू-संतासाठी लंगर केले आणि त्याला सच्चा सौदा असे नाव दिले. युवक अवस्थेत त्यांनी मोदी खाना मध्ये नौकरी केली आणि सोबतच परमेश्वराची निस्वार्थ भक्ती केली.
गुरु नानक यांनी संस्कृत, फारसी, अरबी आणि इतर भाषा अवगत केल्यानंतर विविध धर्मांच्या ग्रंथांचे अभ्यास केले. या जगात कोण-कोणते धर्म अस्तित्वात आहेत, मानव कसले जिवन जगताहेत याचा आढावा घेण्यासाठी गुरु नानक यांनी चार दिशांच्या धर्म यात्रा (तीर्थाटन) केल्या. त्यांच्या ह्या यात्रा उदासी म्हणून ओळखल्या जातात. यात त्यांनी हिंदु तीर्थस्थळांचे दर्शन घेत विविध चाली-रीती जाणून घेतले, तसेच अरब देशात वसलेल्या मुस्लिम धर्माच्या विविध धार्मिक स्थळांना हि त्यांनी भेट देऊन धर्म जाणून घेतला.
त्या काळात इराण, इराक, सुदान, मक्का - मदिना सारख्या अनेक देशांचे भ्रमण करीत दुसरीकडे त्यांनी श्रीलंका सारख्या देशाला हि भेट दिली यावरून हे लक्षात येते की नानकांनी इतर धर्मां विषयी किती अभ्यास केले. आपल्या भ्रमणात त्यांनी हजारोंच्या संख्येत लोकांना भेटी दिल्या. साधू, संत, मुल्ला, मौलवी सहित विद्वान व्यक्तिमत्वाशी हि त्यांनी धर्मावर आधारित चर्चा केली.
वयाच्या ३८ व्या वर्षी गुरु नानक यांना शीख धर्मस्थापने बद्दलचा पहिला साक्षात्कार घडला.
एके दिवशी, नानक हे आपल्या दोन सेवकां सोबत वेई नदी काठी भजन करीत बसले होते. एक होता मर्दाना आणि तो मुस्लिम होता. तर दुसरा होता बाला आणि तो हिंदू होता. अचानकपणे नानक भजन सोडून उठले आणि सरळ वेई नदीच्या पाण्यात उतरले. पाहता - पाहता ते नदीच्या मध्य धारेत जाऊन पाण्यात खाली बुडून गेले. नानक काय करीत आहेत हे त्यांच्या सेवकांना काळात नव्हते. त्यांनी आरडा-ओरड करायला सुरुवात केली. पण तो पर्यंत नानक नाहीशे झाले होते. तिसऱ्या दिवशी नानक पुन्हा पाण्यावर प्रगट झाले. नानकांनी काठावर पोहचून एकच वाक्य उचारला "ना कोई हिंदू, ना कोई मुसलमान. एक पिता एकस के हम बारीक".
असे म्हण्टले जाते की, नानकांना वेई नदीत परमेश्वराचे साक्षात्कार घडले. परमेश्वराशी चर्चा केल्या नंतरच नानकांना खऱ्या धर्माचे बोध झाले. या नंतरच गुरु नानक यांनी "जपूजी साहब" हि धार्मिक वाणी रचली. जपूजी साहब या वाणीत नानक यांनी या सृष्टीच्या रचनेपासून तर मानवांच्या दैनंदिन व्यव्हारा पर्यंत आपले विचार मांडले आहेत. परमेश्वर हा निराकार असून त्यानेच या ब्रह्माण्डाची रचना केली आहे. या पृथ्वी सारखेच असंख्य ग्रह तारामंडळात आहेत याची पूर्व कल्पना देखील त्यांनी त्या काळात आपल्या वाणीतून दिली हे विचार करण्यायोग्यच आहे.
गुरु नानक यांनी आपल्या अनुयायियांना हक्काची कमाई खाण्याचे आणि सर्व जीवजंतूंना हि जगण्याचे अधिकार असल्याचे उपदेश दिले. पापाची कमाई खाऊ नये आणि उपाशी असलेल्यांना अन्नाचे दान करावे, आई - वडिलांचे सम्मान करावे, अंधश्रद्धा बाळगू नये अश्या शिकवणी त्यांनी रुजू केल्या. तर संत असून सुद्धा त्यांनी त्या काळातील शासक बाबर याला उद्देशून पाप का साम्राज्य चालवू नको, गरीब प्रजा हे तुझे कुटुंब होय. त्यांच्यावर अन्याय करू नकोस असे ठणकावून सांगितले.

बाबर यांनी नानक यांना अटक करून कारागृहात पाठविले होते. तेव्हा त्यांच्या सुटके साठी मुस्लिम मौलवी, काजी आणि साधूंनी बाबर पुढे उपस्थित होऊन नानक हे सत्य सांगत आहेत. ते एखाद्या विशिष्ट जातीचे नसून त्यांचे म्हणणे मानवजाती साठी असल्याचे बाबर यांना पटवून दिले. त्यानंतर बाबर यांने गुरु नानांक यांना कारागृहातून बाहेर काढले आणि माफी मागितली. नानक बाबरला म्हणाले, राजा हा प्रजेचा पिता असतो. जर एका पित्यानेच आपल्या मुलाबाळांमध्ये भेद केला तर तो असंगती ठरते. कोण्याच्या सांगण्यावरून नाहीतर स्वतःच्या विश्वासावर साम्राज्य बघ. बाबर नतमस्तक झाला.
गुरु नानक यांनी आपल्या जीवनाच्या शेवट पर्यंत एका परमात्मेची अफाट भक्ती केली. मानवांना जवळ आणण्याचे त्यांनी आपल्या वाणी द्वारे प्रयत्न केले. गुरु नानक देवजी यांचा ५५० वां प्रकाश पर्व (जयंती) वर्ष २०१९ मध्ये साजरी होणार आहे. त्याची तयारी सुरु झाली आहे. या ५४९ व्या जयंती पासून गुरु नानकदेव यांच्या साडे पाच शताब्दी वर्षाची सुरुवात होत आहे. म्हणून सर्वांसाठी हे वर्ष मानव ऊर्जा वर्ष म्हणून साजरा व्हावा.
---------
रवींद्र सिंघ मोदी, नांदेड.
०९४२०६५४५७४.

No comments:
Post a Comment