हिंगोली / प्रतिनिधी
राज्यातील खासदारांची बिएसएनएल सेवेतील अडीअडचणीसंदर्भात मुंबईत आयोजीत आढावा बैठकीत खा.राजीव सातव यांनी हिंगोली लोकसभा क्षेत्रातील दुरसंचार सेवेसंदर्भात समस्या मांडत सेवा सुधारण्याची मागणी केली.
मुंबईत दुरसंचार विभागाच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मुख्य महाप्रबंधक पीयुष खरे, यांच्या प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खा.राजीव सातव यांनी हिंगोली लोकसभा क्षेत्रातील उमरखेड तालुक्यातील दराटी, जेवली, मोरचंडी, औंढा तालुक्यातील वडचुना, सावळी, भोसी, सेनगाव तालुक्यातील हनगदरी, हिवरखेडा, आडोळ, महागाव तालुक्यातील सवना, हदगाव तालुक्यातील केदारगुडा, हिंगोली तालुक्यातील लोहरा, कनका येथील टॉवरची उभारणी तातडीने करण्याची मागणी करत नांदेड-हिंगोली-कन्हेरगाव, नांदेड-वसमत-हिंगोली, औंढा-जिंतुर या राष्ट्रीय महामार्गावर 10 किमीवर टॉवरची उभारणी करण्याची मागणी केली.
तर केसापुर, कडोळी, बाभुळगाव, येडुद, पिंपळदरी, येहळेगाव तुकाराम, डोंगरकडा, दारेफळ, किनवट तालुक्यातील सारखनी, पिंपळगाव, धानोरा, मलकजाम, गुंडे महागाव, हिमायत नगर तालुक्यातील करंजी, आदेगाव येथील नादुरूस्त टॉवरची दुरूस्ती करण्याची मागणी केली. तसेच हिंगोली शहरातील भुमिगत गटार योजनेच्या कामामुळे शहरातील दुरसंचार सेवा विस्कळीत झाली असुन, नविन केबल टाकुन सेवा सुरळीत करा, हिंगोली-वसमत,कळमनुरी, हदगाव, किनवट, उमरखेड येथील कष्टमर केअर सेंटरचे अपगे्रडेशन करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा, लोकसभा क्षेत्रातील नविन वसाहतीत भुमिगत केबल टाकुन 4 जी सेवा देण्याची मागणी केली. कळमनुरी येथे सक्षम अधिकारी नेमण्याची मागणी केली. या अडीअडचणीसंदर्भात महाप्रबंधकांनी योग्य ती उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

No comments:
Post a Comment