वॉशिंग्टन: सध्या शेतकरी अडचणीत सापडलेला असताना सोयाबीनचे भाव वाढणार आहेत असे म्हणणारा व्यापारी व्यापारी खोटारडा, ढोंगी आणि राजकारणी असला पाहिजे असे मत शेतकरी संघटनेचे नेते गुणवंतराव पाटील हंगरगेकर यांनी व्यक्त केले .शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे गाढे अभ्यासक गुणवंतराव पाटील हंगरगेकर सध्या वॉशिंग्टन येथे आहेत .शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात दैनिक मराठवाडा नेताने त्यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले.
आगामी काळात सोयाबीनचे भाव वाढणार आहेत असे म्हणून तो व्यापारी दिशाभुल करत असला पाहिजे .कदाचित शेतकऱ्यांना मूर्ख बनवत असावा किंवा यामागे काहीतरी षडयंत्र असले पाहिजे असेही ते म्हणाले .शेतकरी दिवसेंदिवस अडचणीत सापडत असताना वेगवेगळ्या पद्धतीने चुकीचे उद्योग करून ,निर्ढावलेपणाने काम करण्याची मानसिकता वाढत असताना प्रामाणिक व शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून गुणवंतराव पाटील हंगरगेकर यांच्याशी संपर्क साधला. यावेळी 'फादर ऑफ इकॉनॉमिक्स 'चा संदर्भ देत त्यांनी सोयाबीनच्या भावा संदर्भात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की आपल्या देशात 75 टक्के सोयाबीन आयात केले जाते .भारतात केवळ 25 टक्के सोयाबीनचे उत्पादन होते .आपल्या देशाला आर्थिक दृष्ट्या समृद्ध करावयाचे असेल तर सोयाबीनची आयात बंद केली पाहिजे .शेतकऱ्यांना विविध सवलती देऊन भाव कसे वाढतील याचा प्रयत्न केला पाहिजे .
शेतकरी सुखी झाला तरच समाज सुखी होणार आहे .समाज सुखात असेल तर देशही सुखी होऊ शकतो ,असे हंगरगेकर म्हणाले. वॉशिंग्टन येथे आपण बायर या कंपनीला भेट दिली. ही कंपनी मोनकनटोने विकत घेतली आहे. मका व सोयाबीन शेतीला जेनेटिक मॉडिफिकेशन करणे गरजेचे असल्याचा संदर्भ देत त्यांनी सरकारची धोरणे चुकीची असल्याचे सांगितले. आपल्याकडील सॉल्वंट प्लांट बंद पडतात .सोयाबीन उत्पादनाला मोठ्या प्रमाणात खर्च येतो .तो खर्च कमी झाला पाहिजे. खरेदी करणाऱ्याला भाव वाढणार आहेत हे सांगण्याचा कसलाही अधिकार नाही कारण तुम्ही सरकार नाही .भाव वाढणार आहेत असे सांगून तुम्ही सरकारची दिशाभूल करीत आहात. सोयाबीनचा भाव बाजारात ठरतो .कोणीही व्यक्ती हा भाव ठरवू शकत नाही .याच्या मागे काहीतरी राजकारण असण्याची शक्यता आहे .भावामध्ये 10 ते 20 टक्के चढ उतार होऊ शकतो.
भाव वाढणार असे सांगणे म्हणजे ढोंगी आणि स्वार्थी लोकांनी चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांना गुमराह करण्याचा उद्योग चालविला असण्याची शक्यता आहे ,असेही ते म्हणाले . स्वतः खरेदी करणारा व्यक्ती भाव ठरवू शकत नाही. त्या व्यक्तीचे आंतरराष्ट्रीय बाजारात संपर्क असले तरी तो कोणाचा तरी दलाल असला पाहिजे .ज्या पद्धतीने वातावरण तयार केले जात आहे ती संशयास्पद आहे. सोयाबीन उद्योगात भेसळ करून चुकीची प्रक्रिया केली जात असली पाहिजे .
शासनाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी सवलती दिल्या पाहिजेत .शासनाने दिलेल्या सवलती व्यापारी आणि उद्योजकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील याची खात्री देता येणार नसल्याचे ते म्हणाले. पुढील आठवड्यात आपण भारतात परत येणार आहोत .त्यानंतर शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न व त्यावरील उपाय तसेच शेतकऱ्यांच्या प्रगतीमधील अडथळे यासंदर्भात सविस्तर माहिती देणार असल्याचेही गुणवंतराव पाटील हंगरगेकर यांनी याप्रसंगी सांगितले.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment