शिर्डी : साईबाबांच्या दर्शनासाठी तासन्तास दर्शन रांगेत उभे राहावे लागण्याची प्रतीक्षा आता संपणार असून, साईबाबा संस्थानने अत्याधुनिक पद्धतीची दर्शनरांग उभारण्याचा ११० कोटींचा प्रकल्प हाती घेतला आहे. येत्या १९ तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. वर्षभराच्या कालावधीतच विमानतळाच्या धर्तीवर सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेला दोन मजली प्रकल्प उभारला जाणार आहे. वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असून यामुळे साईभक्तांना केवळ १५ ते २० मिनिटांत साईबाबांचे दर्शन होईल, असा विश्वास साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.
साईबाबा संस्थानही हा प्रकल्प उभारण्यासाठी सन २०१२ पासून प्रयत्नशील होते. अखेर जुन्या प्रसादालयाच्या जागेवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. साईसमाधी शताब्दी महोत्सवाच्या सांगता समारंभास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याने त्यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. वर्षभरात प्रकल्प पूर्ण करून पुढील विजयादशमीपर्यंत भाविकांसाठी दर्शनरांग खुली करण्याचा संस्थान व्यवस्थापन मंडळ व प्रशासनाचा मनोदय आहे..
या प्रकल्पाच्या कामाच्या निविदा काढण्यात आली आहे. ११० कोटी रुपयांचा २० हजार चौरस मीटर असलेला दर्शनरांगेचा हा प्रकल्प दुमजली राहणार आहे. या दोन्ही मजल्यावर मिळून एकाच वेळी सुमारे २४ हजार भाविक सहभागी होऊ शकणार आहेत. या दर्शन रांगेच्या प्रकल्पात तळमजल्यावर विनंती कक्ष, क्लॉक रुम, सुरक्षा तपासणी तर दुसऱ्या मजल्यावर टी.व्ही. स्क्रीन, इमारत ते मंदिरापर्यंत स्कायवॉक राहणार आहे. दर्शन रांगेतील भाविकांसाठी चहा, कॉफी, बिस्कीट मोफत देण्यात येणार आहेत. प्रत्येक मजल्यावर सहा असे बारा एसी हॉल राहणार आहे. एका हॉलची क्षमता दीड ते दोन हजार भक्तांची राहणार आहे. वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असून यामुळे साईभक्तांना केवळ १५ ते २० मिनिटांत साईबाबांचे दर्शन होईल, असा विश्वास साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे..

No comments:
Post a Comment