हिंगोली / प्रतिनिधी
गेल्या एक ते दिड महिन्यापासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तसेच हमीभाव केंद्रही सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने खुल्या बाजारपेठेत शेतमाल विकावा लागतो. यावर्षी पर्जन्यमानही चांगले झाले नाही. त्यामुळे सेनगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी 6 ऑक्टोबर रोजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
शासनाने गेल्या काही दिवसांपुर्वी हमीभाव धोरण जाहीर केले आहे. यामध्ये सोयाबीनला 3 हजार 399 रूपये भाव देण्यात आला आहे. पण शासनाने सुरू केलेले हमीभाव केंद्र अद्यापही कागदावरच आहे. त्यामुळे सोयाबीन, उडीद, मुग यासाठी तात्काळ हमीभाव केंद्र सुरू करण्यात यावे, सरकारच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. गेल्या एक ते दिड महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्याने कापूस, तूर, हळद, फळबागायती क्षेत्र धोक्यात आले आहे.
त्यामुळे सेनगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख, संतोष देवकर, पिंटु गुजर, प्रविण महाजन, सोंडू पाटील, देविदास आण्णा, जगन्नाथ देशमुख, गजानन खंदारे, शैलेश तोष्णीवाल, संतोष पाटील, निखील देशमुख, वैभव देशमुख, योगेश महाजन, फिरोज पठाण यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

No comments:
Post a Comment