बसस्थानकातील दुषित पाणी पुरवठ्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात

Sunday, October 7, 2018

औंढा नागनाथ / प्रतिनिधी
येथील बसस्थानकामध्ये प्रवाशांना पिण्याचे पाणीही दूषित असून पिण्याचे पाणी ज्या ठिकाणी साठवण केल्या जातो तो हौद घाणीच्या विळख्यात मध्ये सापडला आहे. त्या हौद पाण्याभोवती प्रवासी हे लघुशंका करतात. त्यामुळे हे पाणी दूषित होऊन ते बस स्टॅंडच्या वरच्या टाकीमध्ये जाते आणि नंतर ते नळाद्वारे प्रवासी ते दूषित पाणी पिऊन आजारी पडण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. 

या सर्व गोष्टींकडे एसटी महामंडळाचे व वाहतूक नियंत्रकाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. पिण्याच्या पाण्याची टाकी ही कधीही स्वच्छ केल्या जात नाही, पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर झाकणे देखील बसविण्यात आली नाहीत. त्यामुळे वानरे त्या टाकीवर ये-जा करतात. त्यामुळे या पाण्यामध्ये कचरा पडून हे पाणी दुषित होत आहे. आणि हेच दूषित पाणी प्रवाशांना प्या लागते. या बाबत वारंवार प्रवाशांनी दूषित पाण्यासंदर्भात वाहतुक नियंत्रकांना सांगितले. पण वाहतुक नियंत्रक उडवा उडवीचे उत्तरे देत असून याकडे मात्र कानाडोळा करताना दिसत आहेत. मात्र या दूषित पाण्यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याप्रकरणी शिवसेना तालुका प्रमुख साहेबराव देशमुख यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

No comments:

Post a Comment