औंढा नागनाथ / प्रतिनिधी
येथील देवस्थानमध्ये अद्यावत देणगी कार्यालयाचे उद्घाटन 1 ऑक्टोबर रोजी देवस्थानचे विश्वस्त सल्लागार आ. संतोष टारफे यांच्या करण्यात आले. औंढा नागनाथ संस्थांकडून नवीन अद्यावत कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आल आहे. श्रीक्षेत्र नागनाथ मंदिरात होणाऱ्या यात्रा प्रसंगी तसेच दररोज होणाऱ्या भाविकांच्या गर्दीस अनुसरून नागनाथ मंदिरातील नामदेव सभागृहामध्ये देणगी कार्यालयाचं उद्घाटन 1 ऑक्टोबर रोजी नागनाथ संस्थांचे सल्लागार आ. डॉ. संतोष टारफे यांच्या हस्ते करण्यात आले.
भाविकांची वाढलेली गर्दी लक्षात घेता मंदिराच्या पश्चिम दरवाजावरील संत नामदेव प्रवेशद्वारातून भाविक दर्शनासाठी प्रवेश घेत असतात. या भाविकांकडून देणगीच्या रूपात जी संस्थानला उत्पन्न मिळते त्यात विविध विकास कामे संस्थांकडून राबविली जातात. यात्रा काळामध्ये भाविकांना सोयीस्कर व्हावे यासाठी या नवीन कार्यालय आज उद्गाटन करण्यात आलं आहे. या कार्यालयातून भाविकांना देणगीच्या रूपामध्ये तसेच ऑनलाईन दर्शन ऑनलाईन देणगी, लाडू प्रसाद विक्री, भक्तनिवास आरक्षण तसेच भाविकांसाठी चौकशी विभाग (चोवीस तास) अद्यावत अशा कार्यालयांमधून संचलित करण्यात येणार आहे. या अशा अद्यावत कार्यालयामुळे भाविकांना कुठलाही प्रकारची अडचण येणार नाही.
तसेच या ठिकाणी कार्ड स्वाइप करण्याची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या प्रसंगी सल्लागार शिवाजी देशपांडे, आनंद निलावर, उपसचिव विद्याताई पवार, डॉ.विलास खरात, विश्वस्त रमेशचंद्र बगडिया, डॉ. किसन लखमावार, पुरुषोत्तम देव, गणेश देशमुख, गजानन वाखरकर, प्रा. देवीदास कदम, देवस्थानचे व्यवस्थापक शंकर काळे, वैजनाथ पवार आदींची उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment