खा.सातव, आ. टारफे यांच्या उपस्थितीत रस्ता कामाचे भुमिपुजन

Tuesday, October 2, 2018


हिंगोली / प्रतिनिधी
कळमनुरी विधानसभा क्षेत्रातील खरवड व कनका येथे शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सात कोटीच्या रस्ता कामाचे भुमिपुजन खा.राजीव सातव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन आ.संतोष टारफे यांची उपस्थिती होती. 

हिंगोली तालुक्यातील कनका येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत चिंचोली-कनका-मसोड हे एकूण 5.700 किमी लांबीच्या रस्ता कामाचे भूमिपूजन करण्यात आले. कनका येथील रस्ता काम 253.13 लक्ष रु. चा निधी खर्चातुन केला जाणार आहे. तर खरवड येथील रस्ता काम मसोड- जटाळवाडी- मोरवड-खरवड हे 11.600 किमी चे असून 462.17 लक्ष रुपयांचे खर्च होणार आहे. हे रस्ते अत्यंत खराब झाल्यामुळे गावकऱ्यांना दळण-वळणासाठी त्रास सहन करावा लागत होता. परंतू शासनाकडे दोन्ही लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने या रस्ता कामासाठी निधी उपलब्ध झाला आणी आज या रस्ता कामाचे भुमिपुजन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. कार्यक्रमास जिल्हा बॅंकेचे संचालक बाबा नाईक, माजी जिप सदस्य केशवराव नाईक, केशवराव मस्के, एल.जी.घुगे मामा, रमेशराव काटकर, गणेशराव काटकर, प्रकाश गिराम, देवराव पोटे, डॉ. विशाल सोमटकर, सरपंच बबनराव ढाले, सुधाकर पाईकराव, रहीम खान पठाण, काकडे आदी सह मोठ्या संख्येत ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment