सरकारी बँका पाच दिवस बंद

Friday, December 21, 2018


साप्ताहिक सुट्ट्या, सार्वजनिक सुट्टी व कर्मचारी-अधिकाऱ्यांचा संप यामुळे सरकारी बँकांचे कामकाज आज, शुक्रवारपासून (सोमवारचा अपवाद वगळता) सलग पाच दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. आज , शुक्रवारी अखिल भारतीय बँक अधिकारी महासंघाने प्रदीर्घ वेतन सुधार मागण्यांच्या पूर्ततेसाठी संप पुकारला आहे . तर, २६ तारखेला बँक कर्मचाऱ्यांच्या संघटना संपावर जाणार आहेत. यामुळे बँक व्यवहारांवर मोठा परिणाम होणार आहे. 

बँकांकडून सूचना 

या सलग सुट्ट्यांविषयी बहुतांश बँकांनी आपल्या ग्राहकांना सूचित केले आहे. बँकांचे व्यवहार हे प्रत्यक्ष शाखांच्या बरोबरच एटीएम, मोबाइल अॅप, नेटबँकिंग आदी माध्यमांतूनही होत असल्याने ग्राहकसेवेवर फार परिणाम होणार नाही, असे बँकांचे म्हणणे आहे. 

सुट्टीचे वेळापत्रक 

२१ डिसेंबर - बँक अधिकाऱ्यांचा संप 

२२, २३ डिसेंबर - चौथा शनिवार व रविवार 

२४ डिसेंबर - नियमित कामकाज 

२५ डिसेंबर - नाताळची सुट्टी 

२६ डिसेंबर - बँक कर्मचारी संघटनेचा संप 

No comments:

Post a Comment