भाजपा आमदार म्हणतो हनुमानजी मुस्लीम होते !

Friday, December 21, 2018
भाजपा आमदार बुक्कल नवाब यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भगवान हनुमानजी हे मुसलमान होते, असा दावा त्यांनी केला आहे. हनुमान हे मुस्लीम होते म्हणूनच मुसलमानांची नावे ही रहमान, रमजान, फरमान, झीशान, कुर्बान अशी ठेवली जातात. ती त्यांच्या नावावरच ठेवली जातात, असे त्यांनी म्हटले आहे. आमदार बुक्कल नवाब यांच्या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
यापूर्वीही बुक्कल नवाब यांनी अयोध्येतील वादग्रस्त स्थळावर मशीद उभारण्याची मागणी केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर खळबळ उडाली होती. त्यांनी लखनौ येथे अल्पसंख्यक मोर्चादरम्यान हे वक्तव्य केले होते.
आमदार नवाब ‘एएनआय’शी बोलत होते. ते म्हणाले,  माझं मत आहे की, हनुमान हे मुस्लीम होते. त्यामुळेच मुसलमानांमध्ये मुलांना जी नावे ठेवली जातात ती रहमान, रमजान, फर्मान, झीशान, कुर्बान सारखी जेवढीही नावे ठेवली जातात ती हनुमानांवरच ठेवली जातात.

No comments:

Post a Comment