हिंगोली / प्रतिनिधी
तालुक्यातील कनेरगाव नाका येथील ग्रामसेवकास बेदम मारहाण केल्याची घटना 29 सप्टेंबर रोजी घडली असून याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामसेवकास मारहाण प्रकरणी गुन्हा कनेरगाव नाका येथील ग्रामसेवक भुजंग सोनकांबळे हे शनिवारी दुपारी कार्यालयात काम करीत बसले होेते. यावेळी गावातील सुरेश सीताराम आव्हाडे, केशव सीताराम आव्हाडे व एक जण कार्यालयात आले. त्यांनी ग्रामपंचायत मधील नमुना नंबर सात व दहाचे रजिष्टर फाडून टाकले. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर पडलेली वीट फेकुन मारली. त्यामुळे सोनकांबळे यांच्या हाताला दुखापत झाली. तसेच त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सोनकांबळे यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात वरील तिघांवर सरकारी कामात अथडळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment