गोकुलधाम गणेश मंडळाच्या वतीने बक्षिस वितरण

Tuesday, October 2, 2018

हिंगोली / प्रतिनिधी 
येथील तापडी इस्टेट मधील गोकुलधाम सोसायटीमधील श्री गोकुलधाम गणेश मंडळाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील स्पर्धकांना 1 ऑक्टोबर रोजी बक्षिसाचे वितरण करण्यात आले. 

लहान मुला, मुलींकरिता घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये लिंबू चमचामध्ये स्वरा खर्जुले व गौरव पिंगळकर, स्लो सायकलमध्ये क्रिष्णा चव्हाण व मयुरी चव्हाण, संगीत खुर्चीमध्ये मयुर परतवार दिप बाहेती, बकेट बॉल मध्ये व्यंकटेश धर्माधिकारी व मयुरी चव्हाण, डान्समध्ये मानसी कोरडे व आचल जैन, फॅन्सी ड्रेसमध्ये मानसी कोरडे व आचल जैन, गीतगायनमध्ये अंजली सावंत व मयुरी चव्हाण, रनिंग रेसमध्ये प्रांजली सानप व खुशी विसलकर यांनी बक्षिस मिळविले आहे. 

तर महिला करिता घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये संगीत खुर्चीत रजनी पाटील व मालती कोरडे, रांगोळी स्पर्धेमध्ये निशा मुंदडा व शितल धवसे यांना बक्षिसे मिळाली आहेत. यांना 1 ऑक्टोबर रोजी बक्षिसांचे वितरण करण्यात आले. याावेळी प्रमुख पाहुने म्हणून शांतीलाल चौधरी, पोलीस निरीक्षक जगदीश भंडारवार, सामाजिक कार्यकर्त्या वंदना सोवितकर, मंडाळाचे अध्यक्ष राजेश बालदी व गोकुलधाम सोसायटीचे अध्यक्ष आशिष पोरवाल यांची उपस्थिती होती. सुत्रसंचलन रजनी पाटील यांनी तर आभार प्रदर्शन राजेश बालदी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनंजय टेहरे, रामदास पाटील, रजनी पाटील, रोहिणी धर्माधिकारी, कविता पोरवाल, सीमा बालदी, डॉ.विवेक मालपाणी, रमेश झंवर आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment