हिंगोली / प्रतिनिधी
नुकत्याच चंदीगढ राज्यात पार पडलेल्या राष्ट्रीय स्क्वॅश शालेय क्रिडा स्पर्धेत हिंगोलीच्या रेवा नगरे हीने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करीत कास्यपदक पटकाविले.
भारतीय शालेय क्रिडा पेैडरेशनच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्क्वॅश शालेय क्रिडा स्पर्धा चंदीगढ राज्यात 25 ते 29 सप्टेंबर दरम्यान पार पडल्या. हिंगोली येथील बालरोग तज्ञ डॉ. स्नेहल नगरे व पॅथोलॉजीस्ट डॉ. राधा नगरे यांची कन्या रेवा नगरे हीने स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करीत 14 वर्ष वयोगटातून कास्य पदक पटकाविले. रेवा नगरे हीचे औरंगाबाद येथील नाथ व्हॅली स्कुलमध्ये शालेय शिक्षण सुरू आहे. तीच्या यशाचे कौतुक खा. राजीव सातव, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, नगरसेवक अनिल नेनवाणी, सुरेशअप्पा सराफ, निहालभैय्या, अशोक अग्रवाल, बसंतकुमार भट्ट यांच्यासह अनेकांनी केले आहे.

No comments:
Post a Comment