मुंबईः
हाउसफुल ४' या सिनेमाच्या शूटिंगसाठी नाना पाटेकर राजस्थानच्या जैसलमेरमध्ये होते. तेथील शूटिंग संपल्यानंतर नाना पाटेकर जोधपूर येथून विमानाने आज मुंबईत दाखल झाले. मुंबईत आल्यावर पत्रकारांनी त्यांना विमानतळावरच गाठलं. 'मी यावर १० वर्षापूर्वीच बोललो आहे. जे खोटं आहे तेच खोटचं राहणार' असं उत्तर नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ताच्या आरोपांवर दिलं.
अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपांना अभिनेते नाना पाटेकर यांनी आज उत्तर दिलं. 'जे खोटं आहे ते खोटचं असतं', असं म्हणत नानांनी तनुश्री दत्ताचे आरोप सपशेल फेटाळून लावले. नाना पाटेकर आज मुंबईत परतले. मुंबई विमानतळावर पत्रकारांनी त्यांना गाठल्यावर नानांनी तनुश्री दत्ताचे आरोप फेटाळून लावले. तनुश्री दत्ताच्या आरोप प्रकरणी आपण परवा पत्रकार परिषद घेणार असल्याचं नाना पाटेकर यांनी सांगितलं.

No comments:
Post a Comment