लातूर बंदला अभुतपुर्व प्रतिसाद

Thursday, August 9, 2018




लातूर / प्रतिनिधी 
सकल मराठा समाजाच्या वतीने आज 9 ऑगस्ट रोजी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. त्या अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या लातूर बंदला सकाळपासूनच अभुतपुर्व प्रतिसाद मिळत आहे. 
       ठिकठिकाणी शेकडोंच्या संख्येेने आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. सर्वत्र शांततेच्या मार्गाने हा बंद सुरू असून जर कोणी वाहनचालकांनी आंदोलकांची विनंती न ऐकल्यास त्या गाडीची तोडफोड करून नुकसान करण्याऐवजी चाकातील हवा सोडून देण्याचा फंडा आंदोलक वापरत आहेत. यामुळे आंदोलनाला हिंसक वळणही लागत नाही. व चक्काजामही यशस्वीरित्या होत आहे.
शहरातील गूळ मार्केट ,मेन रोड, अशोक हॉटेल ,शिवाजी चौक , राजीव गांधी चौक,या सह अनेक रस्त्यावर आंदोलकांनी टायर जाळून रस्ते रोकले व त्याच ठीकानी ठिय्या करण्यात आला खबरदारीचा उपाय म्हणून शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षण अधिकारी यांनी घेतला परिणामी शैक्षणिक संस्था बँड होत्या एस टी वाहतूक पूर्ण पणे ठप्प होती लातूरच्या दोन्ही बस स्थानकातून एकही बस रस्त्यावर धावली नाही .



मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक शहरातील विविध भागात दुचाकीवरून शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत होते . 
पान टपरी पासून मॉल पर्यंत सारी व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती शहरातील ऑटो वाहतूक सह सिटी बस सेवा पण बंद होती रस्त्यावर आंदोलक आणि तुरळक प्रमाणात सर्वसामान्य नागरिक दिसत होता आजच्या बंद ची कल्पना पूर्वीपासून असल्याने व्यापाऱ्यांसह बहुतांश सामान्य नाहरिकांनी बाहेर पडणे टाळले 

लातूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातून या बद ला मोठा प्रतिसाद मिळाला गावा गावातून आंदोलकांनी रस्त्यावर येऊन ठिय्या मांडला अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींना आंदोलनात सहभाग नोंदवला परिणामी रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला 

 तसेच लातूर ग्रामीणचे आमदार त्र्यंबकनाना भिसे हे चक्का जाम आंदोलनात सहभागी रेणापूरकडे रवाना होत होते. रात्री बारापासून लातूर शहरासह जिल्ह्यात कुठलीही बस आलेली किंवा गेलेली नाही. दरम्यान, खात्रीलायक सुत्राने दिलेल्या माहितीनुसार परिवहन मंत्र्यांनी असा संदेश दिला आहे की, जोपर्यंत पोलीस प्रशासन अधिकृत एसटी बस सोडा अशी परवानगी देत नाही तोपर्यंत आगारातून गाड्या हलवू नये.


मराठा क्रांती च्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंद च्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त ही तगडा ठेवण्यात आला होता आंदोलकांच्या दुचाकी रॅली सोबत पोलिसांची वाहने दिसत होती कसलाही अनुचित प्रकार घडू नये या साठी सीआरपीएफ ची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली होती . मराठा आरक्षण संदर्भात होणाऱ्या दिरंगाई बद्दल आंदोलकात रोष संताप नाराजी मोठया प्रमाणात असल्याचे आजच्या आंदोलनातून दिसून आले 

No comments:

Post a Comment