हिंगोलीत कडकडीत ऐतिहासिक बंद ; स्कूल बस जाळली, बैलगाड्या रस्त्यावर

Thursday, August 9, 2018


 
हिंगोली / प्रतिनिधी 
मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्रच्या वतीने आज 9 ऑगस्ट गुरूवार रोजी मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्या अनुषंगाने सकल मराठा समाजाच्या वतीने हिंगोली जिल्हाही कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. आज भल्या पहाटेपासूनच हिंगोली शहरासह जिल्ह्यातील सर्व बाजारपेठे बंद असून आंदोलकांनी ठिकठिकाणी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने चक्का जाम झाला आहे. तर सेनगाव येथे अज्ञात आंदोलकांनी स्कूल बस जाळून आपला रोष व्यक्त केला आहे. तर बोरजा फाटा येथे आंदोलकांनी बैलगाड्या रस्त्यावर आणल्या आहेत

     आज होणाऱ्या हिंगोली बंदसाठी गेल्या चार ते पाच दिवसांपासून बैठका, निवेदने सुरू होती. सकल मराठा समाजाच्या वतीने आजच्या बंदबाबत आदर्श आचारसंहिताही प्रसिद्ध केली आहे. त्या आचार संहितेला अनुरूप शांततेच्या मार्गाने हिंगोली जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. कालच जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील शाळेला सुट्टी घोषीत केली आहे. तर स्वामी रामानंद विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयालाही विद्यापीठाच्या वतीने सुट्टी घोषीत केली आहे. आजच्या बंदला ऐतिहासिक प्रतिसाद मिळत असून आज सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने आपली प्रतिष्ठाणे बंद ठेवून सहकार्य केल्याचे दिसून येते. शहरातील बळसोंड, लाला लजपतराय नगर येथे महिलांचे ठिय्या आंदोलन आज 11 वाजता होणार आहे. हिंगोली-नांंदेड राज्य रस्त्यावर सावरखेडा पाटीपासून डोंगरकडा गावापर्यंत ठिकठिकाणी मराठा आंदोलक प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. आखाडा बाळापूर येथे चक्का जाम दरम्यान रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले असून माळधामणी फाटा येथे मुंडण आंदोलन सुरू केले आहे. वसमत येथे संतप्त आंदोलकांनी रस्त्यावरच झाडे आडवे करून चक्काजाम चालविला आहे. तर औढा नागनाथ तालुक्यातील बोरजा फाटा येथे आपले गुरे-ढोरे, बैलगाड्या घेवून रस्त्यावर उतरल्याचे चित्र पहावयास मिळते. 



सेनगावात स्कूल बस पेटविली 
सेनगाव शहरात मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. आज बंदच्या दिवशी कुणीतरी अज्ञात आंदोलकांनी स्कूल बस पेटविल्याने या आंदोलकांना हिंसक वळण लागले आहे. सेनगाव येथील ही घटना वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून सर्व आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने हा बंद पार पाडावा असे आवाहन

No comments:

Post a Comment