अहमदपूर / प्रतिनिधी
मराठा, धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे ही माझी आणि शासनाची इच्छा आहे, असं मत माजी मंत्री आ. विनायकराव पाटील यांनी अहमदपूर तालुक्यातील बोडखा व थोटसावरगाव येथे विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी केले. शासन हे लोकहिताच्या योजना राबवित आहे. आणि अशा परिस्थितीत मला मतदारांनी पाठबळ दिले म्हणून मी आमदार झालो. माझी जबाबदारी आहे की, मुलभूत गरजांची पुर्तता झाली, शेतकरी कष्टकर्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि या भुमिकेतून तुमच्या पाठबळामुळे मी विकासाची कामे करीत आहे, असेही आमदार विनायकराव पाटील म्हणाले. तुम्ही मला मत दिले, मला आमदार केले म्हणून अधिकात अधिक निधी खेचून आणण्यासाठी मी काम करत आहे.
वेगवेगळ्या माध्यमातून कामे सुरू आहेत. एका विधानसभा मतदार संघात फ क्त दहा किलोमीटर वर्षाला कामे करायची असतात. पण अहमदपूर विधानसभा मतदार संघात शंभर किलोमीटर रस्त्याचे कामे मंजूर झाले आहेत. एका आमदाराला वर्षाला फंड 2 कोटी असतो. पण मी दरवर्षी दहा कोटी आणतो. मुख्यमंत्री पेयजल योजना 57 गावांना मंजुर केलेली आहे. एमएससीबीचे अठरा वर्षात सबस्टेशन झाले नव्हते तेवढे केले जात आहेत. बारा नविन सबस्टेशन मंजूर केले आहेत. सौरउर्जा सबस्टेशन करत आहोत.
पिकविमा जेवढा जिल्ह्याला त्याचा निम्मा एकट्या अहमदपूर तालुक्यातीला आलेला आहे. माझी आमदारही माझ्यासाठी, माझ्या कुटूंबासाठी नाही. मी अंगणवाडी, बालवाडी किंवा शाळा काढल्या नाहीत. सकाळी सहा पासून झोपेपर्यंत लोकांच्या कामात असतो.
तुम्हीच माझे कुटूंबिय आहात
मला मुलगा नाही, वडील नाहीत, भाऊ नाही आणि तुम्हीच माझे कुटूंबिय आहात. मी काही मोतीराम महाराज नाही, एकाच वेळा दोन-दोन ठिकाणी हजर रहायला अधिवेशनाला मुंबईला जावं लागत. माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. प्रत्येक गावाला रस्ते आणि पाणी मिळावं, रस्ते व्हावे, 350 पाझर तलाव, 42 साठवण तलाव हे तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने झाले आहेत. मी तुमचा सेवक आहे. माज आला तर जिरवण्याची ताकद तुमच्या मतात आहे, असंही यावेळा माजी मंत्री आ. विनायकराव पाटील म्हणाले.
मी अपक्ष म्हणून निवडून आलो, विकासाचा वेग वाढविण्यासाठी, गतीने कामे करण्यासाठी भाजपात प्रवेश केला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटावा ही माझी आणि शासनाची भुमिका आहे. शासन मराठा, धनगर, मुस्लिम सर्वांनाच आरक्षण देण्याच्या मानसिकतेत आहेत. तशा हालचाली देखील चालू आहेत पण थोडा धिर करणं गरजेचे आहे. आंदोलन करत असताना दिशाभूल करणार्या लोकांपासून सावध राहणे गरजेचे आहे. आज विकासाची कामे करत असताना तुम्ही तुमची शान आणि मान उंचावेज असंच काम करेल. मी स्वार्थाचं राजकारण करत नाही. राजकारणाकडे समाजसेवा म्हणून पाहतो. हा माझा धंदा नाही हे सांगून विनायकराव पाटील म्हणाले की, स्वार्थाचे, द्वेषाचे मी राजकारण केले नाही.
पंचवीशे टनाचा कारखाना बाराशे पन्नास दाखविला
आमदार विनायकराव पाटील म्हणाले की, तुम्ही खुशाल कारखाने उभा करा, संस्था काढा पण गोरगरीबांचे वाटोळे करू नका, टेंडर निघाल बाराशे पन्नास टन क्षमतेच्या कारखान्याचे पण प्रत्यक्षात मात्र कारखाना होता पंचवीशे टनाचा. सर्वत्र मतदार संघात शेतीत पाणी व्हावं या भुमिकेतून मी काम करतोय. मतदार संघामध्ये राष्ट्रीय महामार्ग, रस्ते, रेल्वे हे मार्ग होत आहेत. मतदारांनी आशिर्वाद दिले म्हणून हे घडत आहे. मला लोक म्हणतात. कामे चालू आहेत, उद्घाटने नाहीत मी जर ठरवलं तर एक वर्षभर रोज उद्घाटने करता येतील पण मला ते करायचं नाही.
मतदार माझे आहेत. मी मतदारांचा आहे. आपल्याला मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. आपण दोन्हीही पंचायत समिती, नगर परिषद आणि नगर पंचायतला आशिर्वाद दिलेत. आणि आपल्या सर्वांच्या आशिर्वादामुळे विकासाचा वेग वाढतो असंही आमदार विनायकराव पाटील म्हणाले. सकाळी थोर सावरगाव येथे सांस्कृतिक सभागृहाचे भुमिपूजन झाले. त्यानंतर बोडखा येथे सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी कोदलापूरे होते. कार्यक्रमास माजी सभापती आर.डी.शेळके, माजी सभापती हरीभाऊ येरमे, पंचायत समिती सदस्य कमलाकर पाटील, नगराध्यक्ष लक्ष्मीकांत कासनाळे, अमित रेड्डी, राजू खंदाडे, बाळासाहेब आकनगिरे, उपअभियंता शिंदे, इंजिनिअर आरोखी, कमलाकर शेकापुरे, जैनसिंग ठाकूर, रमेश नळापूरे हे होते. यावेळा पंचायत समिती सदस्य कलाकर पाटील व चाकूरचे हातानी यांनी समयोचित विचार मांडले. वळसंगी येथे स्मशानभुमीच्या कंपाऊंड वॉलची पाहणी केली.
त्यानंतर अहमदपूर विधानसभा मतदार संघातील रस्त्याच्या कामासंदर्भात संबंधित खात्यांच्या अधिकार्यांची बैठक घेऊन विकासाची कामे गतीने करावी, दर्जेदार करावीत अशा प्रकारच्या सुचना यावेळा आमदार विनायकराव पाटील यांनी केल्या.
रस्ते, पाझर तलाव व विद्युत विभागाच्या विविध कामासंदर्भात अधिकार्यांना त्यांनी सुचना केल्या. महाराष्ट्रातील बोटावर मोजण्याइतक्या आमदारात विनायकराव पाटील यांचा क्र मांक लागतो. आमदार झालं की, शाळा, कॉलेज हे मिळवायचं, गुत्तेदारी करायची असले उद्योग घडतात. मात्र आमदार विनायकराव पाटील यांच्या विधानसभेची निवडणुकच अठरा प्रगट जातीचे मतदार स्वत: उमेदवा समजुन निवडणुक लढवितात. असेही लोक बोलतात.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment