कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागावे :-आ.सुजितसिंह ठाकुर

Wednesday, August 8, 2018

उस्मानाबाद दि प्रतिनिधी 
येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकांमधे भाजपा केलेल्या विकासकामांच्या बळावर जनतेत जाईल,शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक कुटूंबाला होत असुन बुथ पदाधिकारी कार्यकर्ते यांनी ती माहीती घेऊन निवडणुकाच्या तयारीला लागावे असे आवाहन आ.सुजितसिंह ठाकुर यांनी उपस्थित बुथ पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले.

आज शहरातील व्यंकटेश महाजन महाविद्यालयात भाजपा पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला,या मेळाव्यात ते उपस्थित पदाधिकाऱ्याना मार्गदर्शन करताना बोलत होते
जिल्ह्यात जलयुक्त शिवार,शौचालय अनुदान,गावांतर्गत रस्ते,मोफत विजजोड़नी,100 रु मधे गॅस,शेतकऱ्यांसाठी पिकविमा पुनर्रचना,अपघाता ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत,गंभीर आजारी रुग्णांना थेट मुख्यमंत्री आरोग्य निधी अशा योजना राबविल्या आहेत.

तसेच जिल्ह्याच्या प्रलंबित विकासकामांमधे मुख्यत्र्यांनी लक्ष घालुन सोलापुर तुळजापुर उस्मानाबाद रेल्वे,वैद्यकीय महाविद्यालय,राज्य सहकारी बँक शाखा स्थापना,जिल्ह्यातील मंजुर झालेले रस्ते असे निर्णय अत्यंत वेगाने घेतले आहेत याची माहीती दिली.या मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केले यात त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्यातील संघटनात्मक बांधनीची माहीती दिली.
मेळाव्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज,भारतमाता,व पं दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमा पुजनाने झाली तसेच शहीद मेजर कौस्तुभकुमार राणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी भाजपा प्र.का.सदस्य ॲड मिलिंद पाटील, नितिन काळे,ॲड खंडेराव चौरे,सुधीर पाटील,सरचिटनीस सतीश देशमुख,जालिंधर मोहिते प्रभाकर मुळे यांच्यासह उपाध्यक्ष रामदास कोळगे, ॲड नितिन भोसले,विजय शिंगाड़े धनंजय रणदिवे,व्यंकटराव गुंड,सुरेश पाटील,प्रविण कोळगे,प्रवीण पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment