नांदेड जिल्ह्यात बंद शांततेत सुरु

Thursday, August 9, 2018



नांदेड/विश्‍वास गुंडावार 

 मराठा समाजाला आरक्षण द्यावे,आंंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे या व अन्य मागण्यांसाठी पुकारलेल्या महाराष्टृ बंद मध्ये नांदेड जिल्ह्यात बंद शांततेत सुरु आहे.मराठा संघटनांच्या वतीने अनेक ठिकाणी रास्ता रोकोे करण्यात येत आहे.पोलीसांनी जिल्ह्यत तगडा बंदोबस्त तैनात केला आहे.

मराठा आरक्षणासाठी आज क्रांती दिनाचं औचित्य साधून 9 ऑगस्ट रोजी नांदेड बंद ची हाक देण्यात आली आहे.शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी 9 ऑगस्ट रोजी क्रांतीचं औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली होती. यानंतर गेल्या दोन वर्षात मराठा समाजानं आरक्षणासाठी राज्यभरात 58 मोर्चे काढले. मात्र अद्यापही आरक्षण न मिळाल्यानं आज मराठा समाजानं ’महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. 
शाळा,महाविद्यालये तसेच खाजगी कोचिंग क्लासही  बंद आहेत,नवा मोंढा,शिवाजी नगर,श्रीनगर,वर्कशॉप,कलामंदिर,जुना मोंढा,कापड ,मार्केट,सराफा आदी बाजारपेठ बंद असल्याने रस्त्यावर शुकशुकाट आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ, आयटीआय,तरोडा नाका,सांगवी,वसमत रोड,सिडको आदी ठिकांणी रास्ता रोको शांततेत सुरु आहे.

शिवसेना जिल्हा प्रमुख भुजंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयटीआय येथे ठिय्या आंदोलन सुरु आहे.मुस्लिम समाजानेही मराठा समाजाच्या बंदला जाहिर पाठिेंबा देणारे होर्डिंग शिवाजी नगर भागात  लावले आहे.दरम्यान बंद दरम्यान काही अनुचित प्रकार घडु नये यासाठी पोलीसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे.बंद  शांततेत पाळावा,कायदा हातात घेणार्‍याची गय केली जाणार नाही अशा इशारा पोलीसांनी दिला आहे. 

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment