विष्णुपुरी व निळा रोड येथे टायर जाळुन रास्ता रोको

Thursday, August 9, 2018

नांदेड/विश्‍वास गुंडावार 


मराठा समाजाला आरक्षण द्यावे,आंंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे या व अन्य मागण्यांसाठी पुकारलेल्या महाराष्टृ बंद मध्ये नांदेड जिल्ह्यात बंद शांततेत सुरु आहे.मराठा संघटनांच्या वतीने अनेक ठिकाणी रास्ता रोकोे करण्यात येत आहे.दरम्यान शहपासुन जवळ असलेल्या विष्णुपुरी व निळा रोड येथे आंदोलकांनी टायर जाळुन रास्ता रोको केल्याची माहिती मिळाली आहे.

शहरात येणारे जवळपास सर्वच रस्त्यावर आंदोलकांनी ठिय्या दिल्याने तुरळक ठिकाणी वाहने पाहायला मिळत आहे. मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट पहायला मिळत आहे. दरम्यान, अर्धापूर तालुक्यातील शनी पार्डी येथे नांदेड -हिंगोली रस्त्यावरील अध केल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अशीच परिस्थिती मालेगाव, लातूर फाटा, सावरगाव, धामधरी , निळा आदी ठिकाणी आहे. काही ठिकाणी रस्ता अडविण्यासाठी टायर जाळण्यात येत आहेत तर निळा रस्त्यावर झाड तोडून टाकले आहे.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment