मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळख असलेले अमेझॉनचे (Amazon) संस्थापक जेफ बेजॉस (Jeff Bezos) घटस्फोट घेत आहेत. जेफ बेजॉस आणि पत्नी मॅकेन्जी बेजॉस (Mackenzie) या दोघांनी ट्विटरच्या माध्यमातून सर्व जगाला घटस्फोटाबाबतची (Divorce) माहिती दिली आहे.
या दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया अमेरिकेतील वॉश्गिंटनमध्ये होत आहे. हा जगातील पहिला घटस्फोट असेल ज्याची सेटलमेंट किंमत ही सर्वात जास्त असेल, कारण बेजॉस जगातील सर्वात श्रिमंत आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न 137 बिलियन डॉलर (अंदाजे 9.5 लाख कोटी) आहे. अमेझॉनमध्ये जेफ बेजॉसची 16 टक्के भागिदारी आहे.
No comments:
Post a Comment