पतीनेच कापले पत्नीचे नाक

Friday, January 11, 2019



सांगली: पत्नी सासरी येत नसल्याच्या रागातून पतीने तिचं नाक आणि ओठ कापल्याची धक्कादायक घटना सांगलीजवळच्या कागवाड इथं घडली. कागवाड हे गाव कर्नाटक हद्दीत येतं. या गावात पतीने पत्नीवर चाकूने वार करुन तिचं नाक आणि ओठ कापले. या हल्ल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या महिलेला सांगली जिल्ह्यातील मिरज इथं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पती सुरेश नाईक हा दारु पित असल्याने आणि सततच्या मारहाणीला कंटाळून पीडित पत्नी महिनाभरापासून माहेरी कागवाड इथं राहत होती.

रविवारी पती सुरेश हा कागवाड इथे आला. तो दारुच्या नशेत होता. त्याने तिथेही पत्नीशी वाद सुरु करुन, मारहाण करायला सुरुवात केली. सासरी राहायला का येत नाहीस असा जाब विचारत, दारु प्यायलेला पती सुरेश नाईकने चाकूने वार केले. रागाच्या भरात पतीने पत्नीचं नाक आणि ओठ कापले. त्यानंतर नाक घेऊन फरार गेला. रक्ताच्या थारोल्यात पडलेल्या सुनीताला कुटुंबीयांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं.

No comments:

Post a Comment