त्यांना मोदींचा वाण नाही, गुण लागलाय : अण्णा

Friday, January 11, 2019


अहमदनगर : राफेल करार तसेच लोकपाल, लोकायुक्त आणि शेतीमालाच्या हमी भावावरून केंद्र आणि राज्य सरकारला जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी चांगलंच धारेवर धरलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही मोदींप्रमाणे वागू लागले. मुख्यमंत्र्यांना मोदींचा वाण नाही, पण गुण लागलाय, अशी टीका त्यांनी केली. अहमदनगर जिल्ह्यातील त्यांचं गाव राळेगणसिद्धी येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
संयुक्त संसदीय समिती अर्थात जेपीसीची मागणी नाकारणे याचाच अर्थ राफेलमध्ये काहीतरी तथ्य असावे, अशी शंका अण्णांनी व्यक्त केली. तर सरकारला चौकशीची भीती का वाटते, असा सवाल अण्णांनी व्यक्त उपस्थित केलाय. राफेल प्रकरण हा देशाला धोका आहे, त्यामुळे आपण या संदर्भात माहिती घेत असून त्यानंतर स्पष्ट शब्दात यावर बोलू असे अण्णांनी सांगितलं.

No comments:

Post a Comment