काही तासातच त्यांनी त्या शेतकऱ्याचं कर्ज केलं माफ

Friday, January 11, 2019


बीड : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. बीडमधील सभेत त्यांनी एका शेतकऱ्याला स्टेजवर बोलावलं, ज्याचं कर्ज अजूनही माफ झालेलं नाही. विशेष म्हणजे या शेतकऱ्याला कर्जमाफीचं पत्र देण्यात आलेलं आहे. पण उद्धव ठाकरेंनी स्टेजवर बोलावल्यानंतर काही तासातच या शेतकऱ्याचं कर्ज बँकेकडून माफ करण्यात आलं.
राज्य सरकारने दीड लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर केलेली आहे. पण अजूनही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही. उद्धव ठाकरेंनी या कर्जमाफीचा समाचार घेत, हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेकडून शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा वाटपही करण्यात आलंय.

No comments:

Post a Comment