पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर 11 डिसेंबरला निकाल

Saturday, October 6, 2018



नवी दिल्ली :
निवडणूक आयोगाने आज पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण आणि मिझोराममधील तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. निवडणुकांची घोषणा होताच या पाच राज्यांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. या पाचही राज्यांच्या विधनासभा निवडणुकीचे निकाल ११ डिसेंबरला लागणार आहेत. 

छत्तीसगडमध्ये 12 आणि 20 नोव्हेंबरला दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. मध्य प्रदेश आमि मिझोराममध्ये एकाच टप्प्यात 28 नोव्हेंबरला, तर तेलंगणा आणि राजस्थानमध्ये एकाच टप्प्यात 7 डिसेंबरला मतदान होईल. त्यानंतर चारच दिवसात म्हणजे 11 डिसेंबरला पाच राज्यांचा निकाल लागणार आहे.

तेलंगणा विधानसभा काही दिवसांपूर्वीच भंग करण्यात आली आहे. टीआरएसचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही दिला होता. तर दुसरीकडे मिझोराम या राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता आहे.

राज्य आणि विधानसभेच्या एकूण जागा 
  • राजस्थान - २०० जागा 
  • मध्य प्रदेश - २३० जागा 
  • छत्तीसगड - ९० जागा 
  • तेलंगण - ११९ जागा 
  • मिझोराम - ४० जागा 

No comments:

Post a Comment