लातूर :
रविवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी लातूर येथे अटल महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे .जिल्ह्यातील जनतेचे आरोग्य सुदृढ राहावे ,गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार मिळावे यासाठी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह करून हे शिबिर लातुरात आयोजित केले आहे. जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी या शिबिरात अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन उपचार करून घ्यावेत असे आवाहन युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी केले आहे .
महाआरोग्य शिबिराची माहिती गरजू रुग्णांपर्यंत पोहोचावी यासाठी अरविंद पाटील निलंगेकर यांनी देवणी ,शिरूर अनंतपाळ, औसा येथे विविध संस्था, संघटना आणि सामाजिक संस्थांच्या बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये अरविंद पाटील बोलत होते .ते म्हणाले की कार्यकर्त्यांनी मानवतेच्या भूमिकेतून अटल महाआरोग्य शिबीराचा संदेश गरजू जनतेपर्यंत पोहोचवावा .या शिबिराचा गोरगरीब रुग्णांना लाभ व्हावा यासाठी प्रयत्न करावेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हे क्रांतिकारी अभियान राबविण्यात येत आहे. या शिबिरानंतर पैशाअभावी उपचार घेऊ न शकणारा एकही रुग्ण शिल्लक राहणार नाही.
त्यामुळे रुग्णांनी तपासणी करून घेऊन या शिबिराचा लाभ घ्यावा. रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्य आणि देशातील नामांकित डॉक्टर लातूर येथे येणार आहेत .अटल महा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्याची गंगा आपल्या अंगणात आली आहे. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गरजू रुग्णांना शिबिरा पर्यंत पोहोचवावे, असे आवाहनही त्यांनी केले शिबिराच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,गिरीश महाजन आदी मान्यवर येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली .
देवणी येथील बैठकीस पंचायत समितीचे सभापती , भाजपाचे तालुकाध्यक्ष व पदाधिकार्यांची उपस्थिती होती . युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर हे मायक्रो मॅनेजमेंट साठी प्रसिद्ध आहेत .लातूर येथे होणारे अटल महाआरोग्य शिबिर यशस्वी व्हावे यासाठी ते सर्व बाबीवर जातीने लक्ष देत आहेत. सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. कार्यक्रमासाठी व्यासपीठाची उभारणी , येणाऱ्या डॉक्टरांची व्यवस्था ,पार्किंग यंत्रणा या बाबींकडे ते स्वतः लक्ष देऊन तयारी करून घेत आहेत. कार्यक्रमाचे नियोजन अरविंद पाटील यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे .त्यामुळे हे शिबिर भव्य - दिव्य आणि यशस्वी होणार असल्याची सर्वांनाच खात्री आहे . शिबिरा संदर्भात कसलीही अडचण आली तर थेट आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment