नवी दिल्ली दि
अमेरिकेचा दबाव झुगारून भारताने रशियासोबत तब्बल ४०,००० कोटी रुपयांचा करार केला. या कराराअंतर्गत भारत अत्यंत ताकदीच्या एस ४०० मिसाइल्स रशियाकडून विकत घेणार आहे. २०१४मध्ये पुतिनच्या नेतृत्वाखाली युक्रेन देशातील क्रिमीया प्रांत रशियाने काबीज केला. अमेरिकेसह युरोपातील अनेक प्रभावी राष्ट्रांनी याचा विरोध केला होता.
ऑगस्टमध्ये रशियाशी कोणताही संरक्षण विषयक करार करणार नाही अशी भूमिका अमेरिकेतील ट्रम्प सरकारने घेतली. तसंच रशियाशी संरक्षण करार करणाऱ्या देशांवर जाचक निर्बंध लादले जातील असंही अमेरिकेन स्पष्ट केलं. भारताने रशियाशी कोणत्याहीप्रकारे रशियाशी सलगी करू नये अशी अमेरिकेची भूमिका आहे. पण या विरोधाला झुगारून एस४०० मिसाइल्ससाठी भारताने हा करार केला आहे. भारतीय सैन्याच्या ताफ्यात अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची संख्या खूप कमी आहे. त्या उलट पाकिस्तान आणि चीनकडे मात्र आधुनिक शस्त्रांचा साठा मुबलक प्रमाणात आहे. हे हेरूनच गेल्या दोन तीन वर्षांत भारताने मोठ्या प्रमाणात आधुनिक शस्त्रांची खरेदी केली आहे.
भारताच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ (एनएसआयसी) आणि रशियाच्या जेएससी-रशियन लघु आणि मध्यम उद्योग महामंडळ यांच्यातल्या सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. तसेच भारत आणि रशिया दरम्यान रस्ते वाहतूक आणि रस्ते उद्योगातील द्विपक्षीय सहकार्यावरील सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात या करारामुळे, ठोस रूपरेखा आणि सक्षम वातावरण निर्माण होणार आहे. या करारामुळे दोन्ही देशातल्या उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढीला लागेल तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात व्यापार भागीदारी, संयुक्त उपक्रम सुरू करण्यासाठी मदत होणार आहे. भारतीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी यामुळे नवी बाजारपेठ, संयुक्त उपक्रम, उत्तम प्रथा आणि तंत्रज्ञान सहयोग याद्वारे नवे दालन खुले होणार आहे. उभय देशांच्या लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात सहकार्याला प्रोत्साहन देणे हा या कराराचा उद्देश आहे. तसेच वाहतूक आणि महामार्ग क्षेत्रात सहकार्यासाठी औपचारिक मंच स्थापन आणि विकास करण्याच्या दृष्टीने रस्ते वाहतूक आणि रस्ते उद्योग क्षेत्रातील सामंजस्य करार दोन्ही देशांनी मिळून तयार केला आहे आणि अंतिम स्वरूप दिले आहे.
रस्ते वाहतूक आणि रस्ते उद्योगातील द्विपक्षीय सहकार्यामुळे उभय देशांना लाभ होईल. रशियाबरोबर सहकार्य आणि आदानप्रदानातील वाढीमुळे रस्ते वाहतूक आणि रस्ते उद्योग तसेच कुशल वाहतूक प्रणाली (आयपीए)मध्ये दळणवळण आणि सहकार्यसंबंधी प्रभावी आणि दीर्घकालीन द्विपक्षीय संबंध स्थापित करण्यात मदत मिळेल. यामुळे रस्ते पायाभूत विकासाच्या प्रशासन आणि आयोजनात तसेच देशात रस्ते तंत्र व्यवस्थापन, वाहतूक धोरण, तंत्रज्ञान आणि महामार्गांचे संचलन आणि बांधकामासाठी मानक स्थापन करण्यात मदत होईल. याशिवाय भारत आणि रशियामधील द्विपक्षीय संबंध मजबूत होतील. भारत आणि रशियादरम्यान जुने संबंध असून धोरणात्मक भागीदारी स्तरावर उभय देशांमध्ये मजबूत आर्थिक संबंध आहेत. रशियाने उपग्रह आधारित पथकर प्रणालीसाठी तंत्रज्ञान विकसित केले आहे. रस्ते वाहतूक क्षेत्रात तंत्रज्ञान संबंधी रशियाचा अनुभव लक्षात घेऊन सहकार्याच्या माध्यमातून उत्कृष्ट पद्धती शिकता येईल. भारत महामार्ग संरचना संवर्धन योजना वेगाने लागू करत आहे. उभय देशांदरम्यान भागीदारीतून संचालन स्तरावर आदान-प्रदानाचा मंच उपलब्ध होईल. यामुळे दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंध मजबूत होतील..
No comments:
Post a Comment