शिवभक्तीनंतर राहुल गांधींची दुर्गापूजा व कन्यापूजन करणार

Saturday, October 6, 2018

कोलकाता : शिवभक्तीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आता दुर्गापूजेकडे वळणार आहेत. या नवरात्रीत ते पश्चिम बंगालचा दौरा करण्याची शक्यता आहे.  नुकतीच पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत नवी दिल्ली येथे एक बैठक झाली. या बैठकीत संघटनात्मक तथा आगामी निवडणुकांवर चर्चा करण्यात आली. तसेच राज्य काँगे्रसने दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत दुर्गापूजेच्या काळात पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचा प.बंगाल दौऱ्याचा प्रस्ताव आला असल्याचे म्हटलेले आहे.

राहुल गांधी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची राज्य शाखा मजबूत बनवण्यास सांगितले असल्याची माहिती पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष सोमेन मित्रा यांनी दिली आहे.  दुर्गा पूजा हा राज्यातील सर्वात मोठा सण मानला जातो. काँग्रेस खासदार तथा समन्वय समितीचे अध्यक्ष प्रदीप भट्टाचार्य यांनी म्हटलेे आहे की, राहुल गांधी यांच्या दौऱ्याचा आराखडा तयार झालेला आहे. तसेच राहुल गांधी हे नवरात्रीच्या काळात उत्तर प्रदेशात 'कन्या पूजन' कार्यक्रमासही उपस्थित राहणार आहेत. पक्षाच्या वतीने काँगे्रसची शाखा असलेले सेवादल अष्टमी आणि नवमीला उत्तर प्रदेशात कन्यापूजनचे आयोजन करत आहे. या कार्यक्रमाला पक्षाध्यक्ष राहुल गांधीनी उपस्थित राहावे, अशी अपेक्षा सेवा दलाकडून व्यक्त केली जात आहे..

No comments:

Post a Comment