मोदी सरकारचा धमाका; पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त

Friday, February 1, 2019
नवी दिल्ली 
मोदी सरकारच्या काळातील हा शेवटचा अर्थसंकल्प पीयूष गोयल यांनी शुक्रवारी संसदेत मांडला. आगामी निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारनं घोषणांचा पाऊस पाडला. पाच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करत मोदी सरकारने करदात्यांना दिलासा दिला आहे. 3 कोटी करदात्यांना या नवीन करप्रणालीचा लाभ मिळणार आहे. छोटे शेतकरी, नोकदार वर्ग, कामगारांना या अर्थसंकल्पातून मोठा दिलासा मिळाला आहे. 



आतापर्यंत करपात्र उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख होती. या मर्यादेत वाढ होण्याची अपेक्षा गेल्या काही महिन्यांपासून केली जात होती. ही अपेक्षा पूर्ण करताना सरकारन करपात्र उत्पन्नाची मर्यादा वाढवून थेट पाच लाखांवर नेली. कर रचनेतील या बदलाचा देशातील ३ कोटी करदात्यांना थेट फायदा होणार आहे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प सादर करणाऱ्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं देशातील मध्यमवर्गीयांसाठी आज अत्यंत मोठी घोषणा केली. पाच लाखांपर्यंतच्या व्यक्तिगत उत्पन्नावर यापुढे कोणताही कर लागणार नसल्याचं पियुष गोयल यांनी जाहीर केलं.

आतापर्यंत करपात्र उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख होती. या मर्यादेत वाढ होण्याची अपेक्षा गेल्या काही महिन्यांपासून केली जात होती. ही अपेक्षा पूर्ण करताना सरकारन करपात्र उत्पन्नाची मर्यादा वाढवून थेट पाच लाखांवर नेली. कर रचनेतील या बदलाचा देशातील ३ कोटी करदात्यांना थेट फायदा होणार आहे. 

मोदी सरकारनं आज शेतकऱ्यांना खूशखबर दिली. दुष्काळ व नापिकीच्या समस्येला तोंड देणाऱ्या देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा करण्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे. दोन हेक्टरपर्यंत शेतजमिनीची मालकी असलेल्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार असून एकूण १२ कोटी शेतकऱ्याना याचा लाभ होणार आहे. १ डिसेंबर २०१८ पासून ही योजना लागू होणार असून लवकरच पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला जाईल, असं पीयूष गोयल यांनी सांगितलं. 


भविष्यनिर्वाह निधी व मान्यताप्राप्त फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्या करदात्यांना साडेसहा लाखांपर्यंत एका पैशाचाही कर द्यावा लागणार नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केलं.  केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी नोकरदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. 21 हजार पगार असलेल्यांना 7 हजार बोनस देण्यात येणार आहे. ईपीएफओच्या माध्यमातून हा 7 हजार बोनस मिळणार असल्याचंही गोयल यांनी जाहीर केलं आहे. प्रतिमहिना 15 हजार रुपयांहून अधिक पैसे कमावणाऱ्या मजुरांना श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच मजुरांच्या मृत्यूनंतर 6 लाखांची नुकसानभरपाईसुद्धा देण्यात येणार आहे.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, Add करा 7083550505 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment