केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गरीब सवर्णांना नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण दिलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आरक्षणाबाबतच्या घटनादुरुस्ती विधेयकावर हस्ताक्षर करत या विधेयकाला मंजुरी दिली. हे आरक्षण आजपासून केंद्र आणि राज्यांमध्ये लागू होईल. ज्यांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा कमी शेती आहे, ज्यांच्याकडे 1 हजार स्क्वेअर फुटापेक्षा लहान घर आहे, ज्यांच्याकडे 109 गज पेक्षा कमी (सुमारे 430 चौ. फूट) अधिसूचित जमीन, ज्यांच्याकडे महापालिकेची 209 गज विना अधिसूचित जमीन आहे, हे सर्वजण सवर्ण आर्थिक आरक्षणासाठी पात्र असतील
टीव्ही चॅनलच्या किमती
TRAI ने DTH कंपन्या आणि केबल ऑपरेटर्ससाठी नवे नियम बनवले आहेत. हे नियम आजपासून लागू झाले आहेत. ग्राहक आपल्या मनाप्रमाणे चॅनल निवडून, त्याप्रमाणे पैसे भरु शकतात. जो चॅनल पाहाचा आहे, त्याचेच पैसे द्यावे लागतील.ट्रायने प्राथमिक चॅनलमध्ये 100 चॅनल्सचा समावेश केला आहे, ज्यामध्ये फ्री टू एअर चॅनल्सचाही समावेश आहे. बेस पॅकसाठी 130 रुपये असेल.
उबरची स्पीड बोट.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत उबरने स्पीड बोट सेवा लॉन्च केली आहे. ही सेवा आजपासून सुरु होत आहे. कॅब सेवा देणारी उबर आता स्पीड बोट सेवा देणार आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा जेट्टी या जलमार्गावर लवकरच ही सेवा सुरु होणार आहे. ही मुंबईतील सर्वात जलद बोट सेवा असेल. गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा हे अंतर 19 किमी आहे. स्पीड बोटने हे अंतर कापण्यासाठी केवळ 20 ते 22 मिनिटे लागणार असल्याचं सांगण्यात आलं
अकाऊंटमधील किमान बॅलेन्स मर्यादेत वाढ.
बॅँक ऑफ बडोदामध्ये तुमचं सेव्हिंग अकाऊंट असेल, तर आजपासून या बँकेने काही बदल केले आहेत. बॅँक ऑफ बडोदाने शहरी ग्राहकांच्या किमान बॅलेन्स मर्यादा 1 हजार वरुन 2 हजार रुपये केली आहे. अर्थ शहरी भागात 500 रुपयावरुन 1 हजार रुपये करण्यात आली आहे. ग्रामीण भागात कोणताही बदल केलेला नाही.

No comments:
Post a Comment