फरार असलेला डाॅन रवी पुजारीला आफ्रिकेत अटक

Friday, February 1, 2019


भारतातून गेल्या 15 वर्षांपासून फरार असलेला कुख्यात आरोपी रवी पुजारीला अखेर अटक करण्यात आली आहे. पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल या देशातून त्याला अटक करण्यात आली. बंगळुरु पोलिसांनी रवी पुजारीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. 

त्याच्यावर अनेक वर्षांपासून भारतीय तपास यंत्रणांची नजर होती. रवी पुजारीने अनेक अंडरवर्ल्ड डॉनसोबत काम केलेलं आहे, तो अनेक गुन्ह्यांत आरोपी आहे. त्याच्यावर खंडणी तसेच हत्येचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

नुकतंच भारतीय तपास यंत्रणांना संयुक्त अरब अमिरात (यूएई) येथून ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील आरोपी राजीव सक्सेना आणि मनी लॉड्रिंगमधील आरोपी दीपक तलवारला देशात आणण्यात यश आले. या दोघांनाही बुधवारी भारतात आणण्यात आले.

No comments:

Post a Comment