दुष्काळ व जनसामान्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी जनसंघर्ष यात्रा तीन दिवस नांदेड जिल्ह्यात आ.राजूरकर

Wednesday, October 24, 2018

नांदेड - केंद्र आणि राज्य सरकारने जनतेवर सुरु केलेल्या अन्यायाच्या मालिकेला वाचा फोडून जनसामान्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरु आहे. ही यात्रा सध्या मराठवाड्याच्या दौर्‍यावर असून या यात्रेचा नांदेड जिल्ह्यात तीन दिवस मुक्काम राहणार असल्याची माहिती नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर यांनी आज येथे दिली.

राज्यातील शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक, छोटे व्यापारी अडचणीत सापडले असून या सर्व समाज घटकांना केंद्र आणि राज्य सरकारने वार्‍यावर सोडले आहे. एवढेच नव्हे तर दलित आणि अल्पसंख्यांक समाजावर अन्यायाची मालिका सुरु आहे. राज्यातील मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत यासह अनेक समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरु झाली आहे. 

मराठवाड्यातील या यात्रेची सुरुवात तुळजापूर येथून होणार असून ती यात्रा 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.30 वाजता मुखेड येथे येणार आहे. 3.30 ते 5 वाजेपर्यंत मुखेड येथे जाहीर सभा झाल्यानंतर या यात्रेचे प्रस्थान देगलूरकडे होणार असून देगलूर येथे सायं.6 ते 9 दरम्यान जाहीर सभा आयोजित केली आहे. त्याच दिवशी ही यात्रा नायगाव तालुक्यातील नरसी फाटा इथपर्यंत येणार असून या ठिकाणी यात्रेचा मुक्काम आहे. 

दि.26 रोजी सकाळी 10 वा.नरसीहून यात्रेचा प्रारंभ होणार असून सकाळी 10.30 ते 12 या वेळात नायगाव येथे जाहीर सभा, 12 ते 12.45 राखीव तर 12.45 वा.या यात्रेचे भोकरकडे प्रयाण होणार आहे. दुपारी 3 ते 4.30 या वेळात भोकर येथे जाहीर सभा त्यानंतर यात्रा 4.30 वा.नांदेडकडे प्रयाण करणार आहे. सायं.6 वा.जनसंघर्ष यात्रेचे सिडको येथे आगमन होईल. सिडकोहून ही यात्रा दूधडेअरी मार्गे मार्कंडेय चौक, धनेगाव चौक, वाजेगाव चौक, जुना पुल, देगलूर नाका, बाफना, भगतसिंग रोड मार्गे जुना मोंढा टॉवर, गुरुद्वारा चौक, महावीर चौक, वजिराबाद भागातील मुथ्था चौक, कलामंदिर, शिवाजीनगर, आयटीआय, श्रीनगर, वर्कशॉप मार्गे अशोकनगर, भाग्यनगर, आनंदनगर चौक मार्गे महादेव दालमील, व्हीआयपी रोड अशी फिरुन या यात्रेचे नवा मोंढा मैदानावर जाहीर सभेत रुपांतर होणार आहे. सायं.7 ते 10 या वेळात नवा मोंढा मैदानावर भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 

दि.27 रोजी ही यात्रा सकाळी 9 वा. नांदेडहून निघेल. 9.30 वा. अर्धापूर, लहान, तामसामार्गे दुपारी 1 वा. हदगाव येथे जाणार असून हदगाव येथे जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर या यात्रेचे प्रस्थान हिंगोली जिल्ह्याकडे होणार आहे. या सर्व यात्रेमध्ये राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या समवेत माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ.विजय वड्डेटीवार, आ.बसवराज पाटील, आ.अब्दुल सत्तार, आदींची उपस्थिती लाभणार आहे. 

ही यात्रा यशस्वी करण्यासाठी आ.डी.पी.सावंत, आ.सौ.अमिताताई चव्हाण, आ.वसंतराव चव्हाण, माजी आ.माधवराव पा.जवळगावकर, माजी आ.हनमंतराव पा.बेटमोगरेकर, माजी आ.रावसाहेब अंतापूरकर यांच्यासह ज्या ज्या भागातून ही यात्रा जात आहे त्या त्या भागातील सर्व तालुका अध्यक्ष यात्रा यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहेत. 

जनसामान्यांचे प्रश्न वेशीला टांगून केंद्र आणि राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी तसेच दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली असून या यात्रेत हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, महापौर सौ.शिलाताई भवरे, माजी आ.ईश्वरराव भोसीकर, माजी आ.रोहिदास चव्हाण, उपमहापौर विनय गिरडे पाटील, स्थायी समितीचे सभापती शमीम अब्दुल्ला, सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, माजी महापौर अब्दुल सत्तार, मसुद खान, जि.प.चे शिक्षण सभापती माधवराव मिसाळे, समाजकल्याण सभापती शिला निखाते, माजी उपनगराध्यक्ष किशोर भवरे, कंधारचे माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे, मनपाच्या महिला बालकल्याण सभापती संगीता तुप्पेकर, उपसभापती अल्का शहाणे, युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पप्पू कोेंडेकर, शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, महिला काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकारी मंगलाताई निमकर, सुमती व्याहाळकर, मंगलाताई धुळेकर, अनिताताई हिंगोले, जिल्हाध्यक्षा कविता कळसकर, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष गंगाधर सोंडारे,एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे, कोषाध्यक्ष विजय येवनकर, उपाध्यक्ष शाम दरक, सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, प्रवक्ते संतोष पांडागळे, मुन्तजिब, तालुकाध्यक्ष माधवराव पांडागळे, रंगनाथ भुजबळ, केशवराव इंगोले, जगदिश भोसीकर, संभाजी भिलवंडे, भाऊसाहेब मंडलापुरकर, अ‍ॅड.निलेश पावडे, जि.प.सदस्य मनोहर शिंदे, गंगाप्रसाद काकडे, साहेबराव धनगे, माजी जि.प.सदस्य आनंदराव गुंडले, श्रीनिवास मोरे, डॉ.कालिदास मोरे, सभापती सुखदेव जाधव, उपसभापती पंजाबराव आढाव, विठ्ठल पाटील, दिपक पाटील कोरकेकर, राजेश पावडे, बालाजी सुर्यवंशी, गंगाधर कदम मरळककर, संतोष जानापूरीकर, माधवराव पाटील झरिकर, कैलास जाकापूरे यांनी केले आहे.


मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment