उस्मानाबाद, दि. 23- लवकरच उस्मानाबाद येथील आयकर कार्यालय सुरळीतपणे चालू होवून करदात्यांची गैरसोय दूर होणार आहे, अशी माहिती लातूर विभागाचे संयुक्त आयकर आयुक्त विक्रांतपालसिंह यांनी दिली.
उस्मानाबाद येथे कर सल्लागार संघटनेच्यावतीने आयोजित ‘करदात्यांशी संवाद’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपायुक्त उदलराज, आयकर अधिकारी विशालकुमार, ओव्हाळ, खंडागळे, कार्यालयीन अधिक्षक मते व कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी करदात्यांच्या विविध प्रश्नांना विक्रांतपालसिंह यांनी समर्पक उत्तरे देवून त्यांचे समाधान केले. काही तांत्रिक कारणांमुळे उस्मानाबाद येथील कार्यालयाचे कामकाज रखडले असून येत्या काही दिवसांतच सर्व अडचणी दूर करून कार्यालय लवकर सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री, लक्ष्मीकांत जाधव, लघु उद्योग भारतीचे रमेश सारडा, प्रवीण काळे, संजय देशमाने, कर सल्लागार संघटनेचे बहुसंख्य सदस्य, व्यापारी, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment