हिंगोली / प्रतिनिधी
औंढा व वसमत तालुक्यातही दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तसेच हिंगोली, कळमनुरी व सेनगाव या तीन तालुक्यांची दुष्काळ सदृश्य यादीमध्ये घेण्यात आले आहेत. मात्र औंढा व वसमत तालुके दुष्काळ सदृश्य यादीतून वगळण्यात आले आहेत, त्यामुळे वसमत व औंढा तालुकेही दुष्काळग्रस्त तालुके म्हणुन जाहीर करण्याची मागणी वसमत विधान सभेचे आ.जयप्रकाश मुंदडा यांनी मुख्यमंत्र्यांकड़े केली आहे.
आ.जयप्रकाश मुंदडा यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेवुन सदर मागणीचे निवेदन सादर केले. यात हिंगोली जिल्ह्यात अत्यल्प झालेल्या पावसामुळे जवळ-जवळ 3 ते 5 मीटर पाणी पातळी खोल गेली आहे. जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने हिंगोली, कळमनुरी, सेनगाव या तीन तालुक्याना दुष्काळ सदृश्य यादीत समावेश करण्यात आला आहे. परंतु, वसमत व औंढा नागनाथ तालुक्याला दुष्काळ सदृश्य यादीतून वगळण्यात आल्याने दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यांचा दुष्काळ यादीत समावेश करुन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी आ.जयप्रकाश मुंदडा यांनी मुख्यमंत्र्यांकड़े केली आहे.

No comments:
Post a Comment