कर्नाटक व पष्चिम महाराश्ट्रातून लाखो भक्तांची गर्दी
तुळजापूर दि २३ डाॅ.सतीष महामुनी
कोजागिरी पौर्णिमे निमित्ताने कुलस्वामिनी तुळजाभवानीदेवीच्या दर्षनास हजारो भक्तांची गर्दी उसळली आहे. आंध्रपदेश,तेलंगणा व कर्नाटकातील सुमारे तीन लाखावर भाविकांनी तुळजापूर नगरी ओसंडून वाहत आहे. दोन दिवस असणारी पौर्णिमा बुधवारी दपारपासून सुरु झाली आहे. दोन दिवस पौर्णिमा असल्याने गुरुवारी भाविकांची संख्या वाढणार आहे
कोजागिरी पौर्णिमेस देवीची दसऱ्याला सुरु झालेली श्रमनिद्रा पुर्ण होईल. बुधवारी मध्यरात्री देवी एक वाजुन वीस मिनीटांनी मुख्य सिंहासनावर विराजमान होणार आहे त्याची पुर्व तयारी मंदिर समितीने केली आहे. बुधवारी सकाळी एकरा वाजेपासून पष्चिम महाराष्ट्र व कर्नाटकातून सर्वाधिक भाविकांची पायी चालत येणारी गर्दी तुळजापूरात दाखल झाली. सोलापूरहून हजारो भाविकांनी पदयात्रेला सुरुवात केेली आहे तर कर्नाटकातील चार दिवसापासून पायी निघालेली भाविक तुळजापूरात येण्यास सुरुवात झाली आहे. सायंकाळ पर्यत सुमारे दीड लाखावर भाविक देविदर्शनास आले होते.
तुलाजभवानी मंदिरात दर्शन मंडपाचे सर्व मजले भरून वाहत आहेत भाविकांची गर्दी नियंत्रण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे . मंदिरातील सर्व मोक्याची ठिकाणे सी सी टी व्ही ने बंदिस्त केली आहेत. मंदिरासमोरील भागात भाविकांना सोय असे बाहेर पाडण्याचे मार्ग करून तेथेही पोलीस पहारा लावला आहे. देवीची मंचकी निद्रा चालू असताना दर्शन न घेता देवी उठल्यानंतरच भाविकांची दर्शन घेण्याची इच्छा असते त्यामुळे बुधवारी मध्यरात्रीनंतर भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे
बदलत्या दर्शन व्यवस्थेबददल व पोलीसाकडून शहराबाहेरच वाहने थांबवून सोडण्याच्या पध्दतीबाबत शेकडो मैलावरुन पायी चालत आलेल्या भक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आमचे कुलधर्म कुलाचार करण्यास पोलीस व्यवस्था अडचणीची आहे आम्ही भाविक आहोत मात्र आम्हाला गुन्हेगाराप्रमाणे वागविले जात आहे. ही चुकीची पध्दत असून आमच्या लोकांचे नवरात्र व पौर्णिमा काळातील दर्षन धोक्यात आले आहे अशी प्रतिक्रिया दिली.
हलगी वाजवित डोक्यावर गाठोडे व पिशव्या घेवून महिला वर्ग मोठया संख्येने पायी चालत येत आहे, मुली व बायकांचे मोठे प्रमाण असल्याचे जागोजागी दिसून येत आहे.शंभर व दोनशे लोकांचे जत्थे वाजत गाजत नाचत तुळजापूरात दाखल होत आहेत. तरुण मुलांचे जत्थे वाजत गाजत जल्ल्लोशात येत आहेत.
लातुर रोड वरुन पायी चालत येणारी वाहने बाजार समितीत एकत्रित केले जात आहेत. नळदुर्ग मार्गावरील वाहने हेलीपॅड व तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय तर सोलापूरकडून येणारी वाहने घाटशीळ खालील बाजुस थोपविण्याची नवी यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
तुळजापूरातील बसस्थानक परिसर, भवानी रोड, शुक्रवारपेठ, आर्यचैक, आंबेडकर चैक, शिवाजी चैक, उस्मानाबाद रेाड, कमान वेस याभागात सर्वाधिक भाविकांची गर्दी असून लोक जागा मिळेल तेथे विसवले आहेत. पायी चालून थकलेल्या लोकांना सर्व मार्गावर कर्नाटक व तेलंगणा तील उद्योजकांनी अन्नदानाची सोय केली आहे मोेठया प्रमाणात अन्नदान करण्याचा यावर्शी विक्रम असल्याचे दिसत आहे. अन्नदान करणाऱ्या संस्था व व्यक्तींना वीजेची सोय करण्याची गरज असून हजारो लोकांना अन्नदान करुन सेवा करणारे शेकडो दानशुर व्यक्ती स्वतः तळ ठोकुन मदत करीत आहेत.
तुळजापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष बापुसाहेब कने यांनी मंगळवारपासून आपल्या कर्मचारी वर्गास २४ तास सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासन व कर्मचारी २४ तास स्वच्छता व पाणीपुरवठा, कचरा संकलन अशा कामासाठी तैनात केले आहेत. नगरपालिकेकडून प्रतिवर्षा प्रमाणे जादा कर्मचारी भरती करुन सोयी देण्याचा प्रयत्न केला आहे. संसर्गजन्य रोगांची फवारणी केली जात आहे. जिल्हाप्रशासनाच्या सुचना नुसार अनेक उपाय योजना कार्यान्वित केल्या असल्याचेही नगराध्यक्ष बापुसाहेब कने यांनी सांगितले. आमदार मधुकरराव चव्हाण व नगराध्यक्ष बापुसाहेब कने यांनी हजारो भाविकांचे क्षेत्र तुळजापूरात स्वागत करण्यासाठी मोठया प्रमाणात फलक लावले आहेत.

No comments:
Post a Comment