लातूर /प्रतिनिधी :लातूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील नागरिक आजारमुक्त व्हावेत, कोणालाही आजार शिल्लक राहू नये ,पैसे नसल्यामुळे कोणीही उपचारापासून वंचित राहू नये यासाठी अटल महा आरोग्य शिबिराचे सहसंयोजक अभिमन्यू पवार यांनी कंबर कसली आहे .दि ७ ऑक्टोबर रोजी लातूर येथे होणाऱ्या अटल महा आरोग्य शिबिरात गरजू रुग्णांनी सहभागी होऊन आपला आजार कायमचा दूर करून घ्यावा यासाठी त्यांनी बैठकांचा धडाका लावला आहे. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयामध्ये अभिमन्यू पवार यांचा झंजावाती दौरा सुरू आहे .
भाजपा सरकार आल्यापासून लातूरकरांना काहीही कमी पडू नये यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. सरकार भाजपाचे असले तरी वाढप्या आपला असल्यामुळे लातूर जिल्ह्यातील जनतेला जे - जे हवे आहे ते अगदी सहज प्राप्त होत आहे .बोगीचा कारखाना असाच मिळाला. अभिमन्यू पवार यांनी केलेल्या प्रयत्नामुळे हा प्रकल्प मंजूर झाला आणि आता सुरू होत आहे .
रोजगाराचा प्रश्न मिटल्यानंतर आता जनतेच्या आरोग्याकडे लक्ष दिले जात आहे. जिल्ह्यातील एकही नागरिक उपचारापासून वंचित राहू नये यासाठी अटल महा आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे .रविवार दि ७ ऑक्टोबर रोजी हे शिबीर होणार आहे .अनेक कुटुंबात कोणीतरी आजारी असते पण पैसे नसल्यामुळे त्यांच्यावर उपचार होऊ शकत नाहीत .किरकोळ आजार बरे होतात पण दुर्धर आजारावरील उपचारासाठी लाखो रुपये खर्च येतो .पैसे नसल्यामुळे उपचार होत नाहीत आणि त्या रुग्नाला जीव गमवावा लागतो .असे होऊ नये म्हणून हे शिबीर घेण्यात येत आहे .
या शिबिराची माहिती गरजू रुग्नापर्यंत पोहोचावी यासाठी अभिमन्यू पवार पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे दिवस- रात्र फिरून जनतेपर्यंत ही माहिती पोहोचावीत आहेत. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून जनतेला या शिबिराची माहिती मिळावी आणि गरजू रुग्नांवर उपचार व्हावे ही त्यांची तळमळ आहे. यासाठीच शहर आणि जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयात जाऊन ते विद्यार्थी आणि शिक्षकांच्या भेटी घेत आहेत .या मोफत शिबिराची माहिती त्यांना सांगून आपल्या घरात ,परिसरात किंवा गावात कोणी रुग्ण असतील तर त्यांच्यावर उपचार करून घेण्याचे आवाहन करीत आहेत.
शुक्रवारीही त्यांनी शहरातील शाळा आणि महाविद्यालयांचा झंजावाती दौरा केला .देशीकेंद्र विद्यालय ,चन्नबसवेश्वर महाविद्यालय ,चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालय ,ज्ञानेश्वर विद्यालय येथे भेटी दिल्या .प्रत्येक ठिकाणी या शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णावर उपचार करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. अभिमन्यू पवार यांची ही धडपड आणि प्रामाणिक प्रयत्न पाहून प्रत्येक ठिकाणी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे .त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिलेल्या स्वप्नानुसार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नांनी लातूर जिल्हा लवकरच आजार मुक्त जिल्हा होणार असल्याचे दिसून येत आहे .

No comments:
Post a Comment