लातूर दि प्रतिनिधी :
येथे 7 ऑक्टोबर रोजी अटल आरोग्य महा शिबिर संपन्न होत आहे त्यानिमित्ताने विविध बैठका घेण्यात येत आहेत याच संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक महात्मा फुले आरोग्यदायी योजना याची झाली या बैठकीत पालकमंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर डॉक्टर अशोक कुकडे अभिमन्यू पवार मुख्यमंत्र्यांचे सचिव हे उपस्थित होते या वेळा लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी महत्त्वपूर्ण व ग्रामीण भागातील लोकांसाठी जी आरोग्यदायी योजना राबवली आहे व राबवत आहेत व लाइफ केअर च्या माध्यमातून जे कार्य सुरू आहे याचा उल्लेख करत आज लाइफ केअर च्या प्रमुख डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचा सत्कार करून लाइफ केअर च्या कार्यास शुभेच्छा दिल्या व या संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी विविध योजना व जनतेचे आरोग्य या संदर्भात अधिकात अधिक प्रभावीपणे व अधिकात अधिक उपयुक्त कार्य करावे अशी शुभेच्छा दिल्या
No comments:
Post a Comment